नवी दिल्ली : तुम्ही जर भारतीय स्टेट बँकेचे (SBI) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सगळ्यात मोठी बँक फक्त देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय व्यवहार देखील करते. गेल्या काही दिवसांआधीच बँकेने एक महत्त्वाची घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय व्यवहारात अडचण येत असेल तर ताबडतोब तुमच्या पॅनकार्डसंबंधित माहिती बँकेला द्या अशी अधिसूचना देशाबाहेरील ग्राहकांसाठी बँकेने जारी केली होती. (sbi Alert state bank of india update your pan bank if having trouble with the international transactions)
एसबीआयने ट्वीट करून यासंबंधी एक माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, एटीएम, पीओएस / ई-कॉमर्सद्वारे आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी आपले एसबीआय डेबिट कार्ड वापरण्यासाठी बँकेत पॅन कार्डची माहिती अपडेट करा असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.
Having trouble with the international transactions? Update your PAN details in the bank’s record to enjoy seamless foreign transactions through SBI Debit Card.#SBI #StateBankOfIndia #DebitCard #PANDetails pic.twitter.com/kyo9wBMGuc
— State Bank of India (@TheOfficialSBI) January 19, 2021
खात्यातशी कसे जोडाल पॅनकार्ड ?
बँकबाजार डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, कोणताही एसबीआय ग्राहक पॅनकार्ड एसबीआय खात्यासह ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही ठिकाणी जोडू शकतात. यासाठी www.onlinesbi.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन My Accounts ऑप्शन निवडा आणि Profile-Pan Registration वर क्लिक करा.
यानंतर एक नवं पान उघडलं जाईल. यामध्ये जर तुमचं पॅन खातं आधीपासूनच बँक खात्याशी लिंक असेल तर तसं तुमच्या स्क्रिनवर दिसेल. जर खातं पॅनशी जोडलेलं नसेल तर तुम्हाला खाते क्रमांक विचारला जाईल. यावर, खाते क्रमांक निवडा आणि तिथे दर्शविलेल्या पर्यायामध्ये पॅन नंबर भरा. यानंतर सबमिट करा. या प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पॅन नंबर जोडू शकता. (sbi Alert state bank of india update your pan bank if having trouble with the international transactions)
संबंधित बातम्या –
जन धन खाते असल्यास 31 मार्चपर्यंत करा हे काम, अन्यथा लाखोंचं नुकसान
LPG Gas कनेक्शन घेतल्यावर सरकार देणार 1600 रुपये, तुम्हीही घेऊ शकता संधीचा लाभ
Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा आजचे दर
(sbi Alert state bank of india update your pan bank if having trouble with the international transactions)