Marathi News Business SBI Alert! To save your bank account from being emptied, then use this trick, follow these 8 steps
SBI Alert! बँक खाते रिकामी होण्यापासून वाचवायचेय, मग ही ट्रिक वापरा, ‘या’ 8 टप्प्यांचे पालन करा
सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना नेटबँकिंग किंवा मोबाईल बँकिंगचा पासवर्ड मजबूत ठेवण्याचा सल्ला दिलाय. एसबीआयने ट्विट करून ग्राहकांना पासवर्ड कसा मजबूत ठेवायचा ते सांगितलेय. जर तुम्हालासुद्धा तुमचा पासवर्ड मजबूत करायचा असेल तर तुम्ही बँकेच्या या 8 पद्धती वापरून पाहू शकता.
1 / 8
मजबूत पासवर्ड तयार करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे त्यात संख्या आणि चिन्हे समाविष्ट करणे. एसबीआयच्या मते, पासवर्डमध्ये संख्या आणि चिन्हे दोन्ही वापरा. उदाहरणार्थ - AbjsE7uG61!
2 / 8
एसबीआयने सांगितले की, तुमच्या पासवर्डमध्ये किमान 8 अक्षरे असावीत. त्यात सर्व कॉम्बिनेशन असणे आवश्यक आहे. उदा - aBjsE7uG
3 / 8
एसबीआयने एका ट्विटमध्ये एक व्हिडीओ शेअर केलाय, ज्यामध्ये पासवर्ड मजबूत बनवण्याचे 8 मार्ग सांगण्यात आलेत. पहिली पद्धत- दोन्ही अप्परकेस आणि लोअरकेसचे संयोजन पासवर्डमध्ये असावे. जसे - aBjsE7uG.
4 / 8
गेल्या काही दिवसांमध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे ग्राहकांच्या तसेच बँकांच्या अडचणी वाढत आहेत. हे पाहता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना नेटबँकिंग किंवा मोबाईल बँकिंगचा पासवर्ड मजबूत ठेवण्याचा सल्ला दिलाय. एसबीआयने ट्विट करून ग्राहकांना पासवर्ड कसा मजबूत ठेवायचा ते सांगितलेय. जर तुम्हालासुद्धा तुमचा पासवर्ड मजबूत करायचा असेल तर तुम्ही बँकेच्या या 8 पद्धती वापरून पाहू शकता.
5 / 8
लक्षात ठेवण्यासाठी कीबोर्ड मार्ग 'qwerty' किंवा 'asdfg' वापरू नका हे व्हिडिओ स्पष्ट करते. त्याऐवजी ":) '',":/' वापरा. एसबीआयच्या मते, खूप सामान्य पासवर्ड तयार करू नका. उदा - 12345678 किंवा abcdefg
6 / 8
मजबूत पासवर्ड तयार करण्यासाठी सामान्य शब्द वापरू नका. उदा- itislocked आणि thisismypassword
7 / 8
सशक्त पासवर्ड असा असावा की, त्याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. अंदाज लावण्यास सोपे पर्याय वापरू नका. उदा - DOORBELL -DOOR8377
8 / 8
तुमचा पासवर्ड लांब ठेवा आणि ते तुमच्या नावाशी आणि जन्मतारखेशी जोडू नका. जसे - Ramesh@1967. बँक म्हणाली, तुमचा पासवर्ड तुमची सही आहे. त्यामुळे तो मजबूत ठेवा