मुंबई : जर तुमचेही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कोरोना काळात सध्या बँकेत मर्यादित कर्मचाऱ्यांमध्ये काम सुरु आहे. त्यामुळे जर ग्राहकांना काही अतिमहत्त्वाचे काम असेल तरच बँकेत जा, असे आवाहन केले आहे. तसेच जेवढी शक्य असेल तेवढी जास्तीत जास्त काम ऑनलाईन माध्यमातून करा, असा सल्ला दिला जात आहे. त्यानुसार नुकतंच बँकेने काही कामांची यादी जाहीर केली आहे. यापुढे जर ग्राहकांना ही काम असतील तरच तुम्ही बँकेत जा, असे सांगण्यात आले आहे. (SBI Bank Account Holder Alert following essential activities operating in banks)
जर ग्राहकांना कोरोना काळात बँकेत जायचे असेल तर या चारपैकी एखादे महत्त्वाचे काम असेल तरच जा. अन्यथा बँकेत जाणं टाळा. कारण सद्यस्थितीत बँकेत या व्यतिरिक्त कोणतीही इतर कामे केली जात नाहीत. त्यासोबतच बँकेत सोशल डिस्टन्सिंगचेही पालन केले जात आहे. जर तुमचेही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल, तर तुम्हीही बँकेत जाण्यापूर्वी ही यादी नक्की पाहा. अन्यथा तुमचे बँकेत जाणे व्यर्थ ठरु शकते.
SBI चं ट्वीट
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत कोरोनामुळे बँकेत मर्यादित कर्मचाऱ्यांमध्ये काम केले जात आहे. त्यामुळे जर खाली नमूद केलेल्या कामांसाठी बँकेत जा. त्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे कोणतीही तातडीची कामं असतील तरच बँकेत जाता येईल. अन्यथा तुम्हाला बँकेत जाता येणार नाही. नुकंतच याबाबतची नियमावली जारी करण्यात आली आहे.
We understand your concern. Due to Covid 19, we are operating with limited staff. All banks are undertaking the following essential activities – a. Cash deposit and withdrawals, b.Clearing of cheque, c.Remittances, and d.Government transactions. We request you to plan (1/2)
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 5, 2021
‘ही’ चारचं काम बँकेत करता येणार
काही दिवसांपूर्वी एका SBI ग्राहकाने बँकेतील अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला होता. यानुसार, आता सर्व कामं बँकेत होत नाही. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर ऑनलाईन काम करा, असा सल्ला दिला आहे.
?पैसे जमा करणे आणि पैसे काढणे
?चेक क्लियरिंग
?पैसे ट्रान्सफर करणे (remittance) ( जर तुम्हाला एका अकाऊंटमधून दुसऱ्या अकाऊंटमध्ये किंवा परदेशात पैसे पाठवायचे असेल)
?सरकारी व्यवहार
बँक शाखांमधील कामकाजाचा कालावधी कमी झालेय. राज्यस्तरीय बँकर्स समितीने यासंदर्भात बैठक घेण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना संक्रमणापासून बँक कर्मचारी आणि ग्राहक दोघांचीही सुरक्षा लक्षात घेता कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत अनेक ग्राहक बँकेत 2 वाजेपर्यंत काम आटोपून निघून जायचे, परंतु त्यांना आता चार वाजेपर्यंत बँकेची कामं करता येणार आहे. तसेच एसबीआयनं बँकेच्या कामकाजाची वेळ वाढवल्यामुळे बँकेमध्ये होणारी गर्दीही कमी होणार आहे. (SBI Bank Account Holder Alert following essential activities operating in banks)
संबंधित बातम्या :
मॅनेजमेंट बदलताच ‘या’ कंपनीचे शेअर होल्डर्स मालामाल, एका शेअरची किंमत 100 रुपयांहून कमी
‘पीएफ’चे नवीन नियम माहीत आहेत काय?; पटापट वाचा, नाही तर मोठा आर्थिक फटका बसणार!