सावधान! KYC च्या नावाने ग्राहकांची फसवणूक, SBI बँकेचा मोठा इशारा

| Updated on: Jan 16, 2021 | 7:06 PM

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटरवर व्हिडीओ जारी करत ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे (SBI bank alert to customers about fraud in KYC verification)

सावधान! KYC च्या नावाने ग्राहकांची फसवणूक, SBI बँकेचा मोठा इशारा
एसबीआयने स्वातंत्र्याच्या अमृतवर गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज इत्यादी सवलती देखील जाहीर केल्यात. गृह कर्जाच्या विशेष योजनेंतर्गत एसबीआयने शून्य प्रक्रिया शुल्क अर्थात ते पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आणि महिलांसाठी योनो अॅपद्वारे अर्ज करणाऱ्या सर्व लोकांसाठी, व्याजावर 0.05 टक्के सवलत दिली.
Follow us on

मुंबई : देशात सायबर क्राईम ही समस्या पोलिसांठी मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. हॅकर्सकडून अनेकांना लुबाडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. याच घटनांच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटरवर व्हिडीओ जारी करत ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बँक KYC पद्धतीने ग्राहकांशी बातचित करुन सत्यता पडताळणी करते. मात्र, याच पद्धतीचा वापर करुन काही भामटे सर्वसामान्यांना लुबाडण्याचं काम करत असल्याचं स्टेट बँकेने ट्विटरवर सांगितलं आहे. त्यामुळे स्टेट बँकेने KYC च्या नावाने करण्यात आलेल्या बनावट फोन कॉलच्या बळी पडू नये, असा इशारा देण्यात आला आहे (SBI bank alert to customers about fraud in KYC verification).

स्टेट बँकेने ट्विटरवर नेमकं काय म्हटलंय?

“KYC पद्धतीने ग्राहकांची सत्य माहिती पडताळणी करण्याच्या नावाने काही लोक तुमची फसवणूक करत आहेत. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा. त्यामुळे कोणत्याही कॉल किंवा मेसेजला बळी पडू नका. चोरटे फोनवर बोलताना बँकेचा कर्मचारी असल्याचं सांगत खोटं नाटक करतात किंवा मसेज करतात. पण त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका”, असं स्टेट बँकेने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे.

“कुणासोबतही OTP शेअर करु नका. रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅप्सपासून सावध राहा. आपल्या आधारकार्डची कॉपी कुणासोबतही शेअर करु नका. वेळोवेळी आपला पासवर्ड बदला. कुणाहीसोबत आपला मोबाईल नंबर आणि गोपनीय माहिती शेअर करु नका. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी विचार करा”, असंदेखील व्हिडीओत म्हटलं आहे (SBI bank alert to customers about fraud in KYC verification).

गृहमंत्रालयाचाही इशारा

दरम्यान, सायबर क्राईमबाबत नुकत गृहमंत्रालयाने ट्विटरवर सावधानतेचा इशारा जारी केला होता. ट्विटरवर ‘सायबर दोस्त’ या केंद्र सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. सायबर गुन्हेगार लोकांना मेसेज करुन अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडून अनेक लोक यामध्ये बळी ठरले आहेत. अनेकांना यामुळे लुबाडलं गेलं आहे. सायबर क्राईमच्या अशा विविध घटना समोर आल्यानंतर केंद्र सरकारने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर

सायबर गुन्हेगार लोकांना मेसेज पाठवत आहेत. या मेसेजमध्ये ते एक लिंकदेखील पाठवतात. या लिंकवर चुकूनही क्लिक केलं तर युजर्सचं मोठं नुकसान होत आहे. “तुमचं बँक खातं नॉमिनीसोबत जोडलं गेलं आहे. तुम्ही पुढच्या 30 मिनिटात नॉमिनीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करु शकतात. जर तुम्ही तसं केलं नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तक्रार दाखल करु शकतात”, असं मेसेजमध्ये लिहिलेलं असतं.

संबंधित बातमी :

तुम्हालाही आलाय ‘हा’ मेसेज, तर सावधान! तुमचे पैसे चोरीला जाऊ शकतात, गृह मंत्रालयाचा इशारा