नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे सध्या अनेकांचा आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. अशा लोकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) विशेष कर्ज योजना जाहीर केली आहे. कवच पर्सनल लोन, असे या योजनेचे नाव आहे. या योजनेतंर्गत कोणत्याही व्यक्तीला 25 हजार ते 5 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. या योजनेमुळे कोरोनामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याचा SBI चा मानस आहे. (Know about SBI Bank personal loan offer)
तुम्ही कर्ज घेतल्यानंतर ते तुम्हाला मुदतीपूर्वी फेडायचे असेल तर त्यावर कोणता दंडही लागणार नाही. कमी व्याजदरासोबत कर्ज फेडण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी स्टेट बँकेने देऊ केला आहे. तसेच कर्जदरांना तीन महिन्यांच्या मोरेटोरियमची सुविधाही देण्यात आली आहे.
हे कर्ज देताना बँक तुमच्याकडून कोणतीही प्रोसेसिंग फी घेणार नाही. या कर्जासाठी वार्षिक व्याजदर 8.5 टक्के इतका आहे. तसेच फोर क्लोझर आणि प्री पेमेंटवरही कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
स्टेट बँकेचे पेन्शनधारक, नोकरी आणि व्यवसाय करणारी कोणतीही व्यक्ती हे कर्ज घेऊ शकते. 1 एप्रिल 2021 नंतर तुम्हाला किंवा तुमच्या कुटंबातील कोणालाही कोरोनाची बाधा झाली असेल तर तुम्ही या कर्जासाठी पात्र आहात. कर्ज घेण्यासाठी कोरोना रिपोर्ट दाखवणे बंधनकारक आहे.
तुम्हाला SBI कवच पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुम्ही नजीकच्या शाखेशी संपर्क साधू शकता. याशिवाय, SBI च्या योनो अॅपचा वापर करुनही तुम्ही कर्जासाठी अर्ज भरू शकता. कर्जाची रक्कम ग्राहकाच्या पगार किंवा बचत खात्यामध्ये जमा केली जाईल.
संबंधित बातम्या:
मुंबईतील डबेवाल्यांच्या मदतीसाठी परदेशी बँकेचा पुढाकार; 15 कोटींची मदत करणार
6th Pay Commission बाबत मोठी बातमी, 1 जुलैपासून सर्व नियम लागू होणार
अमेरिकेच्या जेबीएल कंपनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक; पुण्यात उभारणार प्रकल्प
(Know about SBI Bank personal loan offer)