नवी दिल्ली : जर आपण भारतीय स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल तर आपल्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे. 1 एप्रिल म्हणजे आज एसबीआय ग्राहकांना यूपीआयद्वारे पेमेंट करणे शक्य होणार नाही. आज दुपारी एसबीआयचा इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म जवळपास साडेतीन तास ठप्प राहणार आहे. गेल्या साडेतीन तासापासून इंटरनेट बँकिंग, योनो अॅप व योनो लाइट अॅप उपलब्ध होणार नसल्याचे बँकेने म्हटले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने महत्त्वपूर्ण नोटिस अंतर्गत ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. (sbi banking services down for 3 hours for today 1 april 2021 sbi important notice for customer)
सायंकाळी 5:40 पर्यंत सेवेवर होईल परिणाम
एसबीआयने याबद्दल ट्विट करून लोकांना सावध केले आहे, जेणेकरून उर्वरित वेळेत लोक त्यांच्या महत्त्वपूर्ण कामांना सामोरे जाऊ शकतात. बँकेच्या ट्वीटनुसार 1 एप्रिल रोजी दुपारी 1:10 ते संध्याकाळी 5:40 पर्यंत आपण इंटरनेट बँकिंग, योनो अॅप आणि योनो लाइट अॅप वापरण्यास सक्षम राहणार नाही.
We request our esteemed customers to bear with us as we upgrade our digital banking platforms to provide a better online banking experience.
#SBI #StateBankOfIndia #ImportantNotice #InternetBanking #OnlineSBI pic.twitter.com/4bad0EnRnw— State Bank of India (@TheOfficialSBI) April 1, 2021
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल रोजी बँक ग्राहकांना यूपीआय व्यवहारात अडचण येऊ शकते. कारण, आज बँक आपले यूपीआय प्लॅटफॉर्म अपग्रेड करेल, जेणेकरुन ग्राहकांचा अनुभव सुधारला जाईल. यावेळी ग्राहकांना यूपीआय व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात. यासाठी बँकेने पर्यायही दिले आहेत.
बँकेने ट्वीट करून मागितली माफी
एसबीआयने ट्वीट करत, “आम्ही आमच्या आदरणीय ग्राहकांना विनंती करतो की आम्ही त्यांचा इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म सुधारित करू जेणेकरून त्यांना ऑनलाइन बँकिंगचा एक चांगला अनुभव मिळावा. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.”
खरंतर, देशभरात एसबीआयचे 44 कोटीहून अधिक ग्राहक आहेत. एसबीआयने डिजिटल व्यवहारांमध्ये जे विक्रम केले त्यातील योनो अॅपचे मोठे योगदान आहे. आकडेवारीनुसार बँकेने योनोमार्फत 10 लाखाहून अधिक वैयक्तिक कर्जाचे वितरण केले आहे. (sbi banking services down for 3 hours for today 1 april 2021 sbi important notice for customer)
संबंधित बातम्या –
फक्त 5 हजारात सुरू करा बक्कळ कमाई देणारा व्यवसाय, पहिल्याच महिन्याला कमवाल 20000
Gold Silver Price Today : सोन्याच्या किंमती वाढल्या, चांदी घसरली; वाचा आजचे ताजे दर
आजपासून बदलले महत्त्वाचे नियम, गॅस सिलेंडर ते हवाई प्रवासामध्ये मोठे झाले बदल