SBI Offer: एसबीआयची नवीन गृहकर्जाची ऑफर, जाणून घ्या फायदे अन् अर्ज कसा करावा

| Updated on: Aug 16, 2021 | 7:36 AM

तुम्हाला बँकेकडून संपर्क साधला जाईल. 75 व्या स्वातंत्र्यदिनी एसबीआय ऑफर देण्यात आलीय. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) आपल्या ग्राहकांसाठी शून्य प्रक्रिया गृह कर्ज सुरू केले आहे.

SBI Offer: एसबीआयची नवीन गृहकर्जाची ऑफर, जाणून घ्या फायदे अन् अर्ज कसा करावा
एसबीआय
Follow us on

नवी दिल्लीः  तुम्ही मिस्ड कॉल देऊन देखील अर्ज करू शकता? SBI ने यासाठी एक मोबाईल क्रमांक (7208933140) देखील जारी केलाय. या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्ही गृहकर्जही मिळवू शकता. तुम्हाला बँकेकडून संपर्क साधला जाईल. 75 व्या स्वातंत्र्यदिनी एसबीआय ऑफर देण्यात आलीय. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) आपल्या ग्राहकांसाठी शून्य प्रक्रिया गृह कर्ज सुरू केले आहे.

महिलांसाठी विशेष लाभ देण्यात येणार

एसबीआयने गृह कर्जासाठी शून्य प्रक्रिया शुल्कासह इतर अनेक फायदे सादर केले आहेत. यामध्ये महिलांसाठी विशेष लाभ देण्यात येत आहे, तर एसबीआयच्या मोबाईल अॅप YONO द्वारे अर्ज केल्यावर व्याज सवलत दिली जाते. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयने म्हटले आहे की या स्वातंत्र्यदिनी, शून्य प्रक्रिया मोफत गृहकर्जासह आपल्या स्वप्नांच्या घरात पाऊल टाका. आत्ताच अर्ज करा.

महिलांना गृहकर्जावर अतिशय आकर्षक सवलत

यासोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) महिलांना गृहकर्जावर अतिशय आकर्षक सवलत देत आहे. बँकेच्या होम लोन सुविधेअंतर्गत महिलांना 5 टक्के बीपीएस व्याज सवलत देखील दिली जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. बँकेने म्हटले आहे की या सुविधांव्यतिरिक्त, जर ग्राहक SBI च्या YONO सेवे अंतर्गत गृहकर्जासाठी अर्ज करतो, तर त्याला 5% BPS व्याज सवलत मिळेल. या एसबीआय गृहकर्जावर 6.70 टक्के व्याज द्यावे लागेल.

अर्ज कसा करावा?

यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि या मोहिमेचा एक भाग म्हणून एसबीआयने ही आकर्षक गृहकर्ज सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, कोणतीही व्यक्ती SBI च्या डिजिटल सेवा YONO SBI द्वारे गृहकर्जासाठी अर्ज करू शकते.

तुम्ही मिस्ड कॉल देऊन देखील अर्ज करू शकता?

एसबीआयने यासाठी मोबाईल क्रमांक (7208933140) जारी केला आहे. या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्ही गृहकर्जही मिळवू शकता. तुम्हाला बँकेकडून संपर्क साधला जाईल.

संबंधित बातम्या

तुम्ही पीएफचे पैसे काढताना ही चूक तर करत नाही ना, अन्यथा कर भरावा लागणार

Paytm पेमेंट्स बँकेच्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी, रिचार्ज आणि बिलवर पेमेंटवर 20% सूट

SBI Offer: SBI’s new home loan offer, find out the benefits and how to apply