नवी दिल्ली : देशातली सगळ्यात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेची (SBI) ऑनलाइन बँकिंग सेवा (Online Banking Services) ठप्प झाली आहे. त्यामुळे ग्राहकांचे मोठे हाल होत आहेत. बँकेने आज एक ट्वीट करत यासंबंधी माहिती दिली आहे. सध्या बँकेचे ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले असून फक्त ATM आणि POS मशीन सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. तात्काळ दुरुस्तीचं काम सुरू असून ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावं लवकरच सामान्य सेवा सुरू होईल असं बँकेनं म्हटलं आहे. (sbi online banking services has stop but atms are working breaking news)
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन सेवा बंद झाली आहे. यामुळे तुम्ही कोणालाही मोबाईल अॅप किंवा मनी टान्सफरिंग अॅपद्वारे पैसे पाठवू शकत नाही. पण ग्राहकांसाठी एटीएम सेवा सुरू असल्याचं बँकेने म्हटलं आहे. खरंतर SBI ही भारतातील सगळ्यात मोठी बँक आहे. त्यामुळे अचानक ऑनलाइन सेवा बंद पडल्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.
SBI ने दिलेल्या माहितीनुसार, दुपारपर्यंत ग्राहकांना सर्व सेवा पुन्हा वापरता येतील. अनेक SBI ग्राहकांनी व्यवहार करताना ग्लिच येत असल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. SBI च्या YONO अॅपद्वारे उपयोगकर्त्याला खातं वापरत येत नाही अशी माहिती ग्राहकांनी दिली आहे.
दरम्यान, SBI सेवा बंद पडल्यामुळे ग्राहकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. ऑनलाइन सेवा बंद पडणार आहे यासंबंधी बँकेने प्रत्येक ग्राहकाला मेसेज पाठवला पाहिजे असे सल्ले ट्विटर द्वारे करण्यात देण्यात आले आहेत. तर कालपासून ऑनलाइन सेवा बंद असल्याचं काही ग्राहकांनी म्हटलं आहे.
खंरतर, SBI ही बँक सध्या 30 पेक्षा जास्त देशांमध्ये सेवा देते. या बँकेचे 6.6 कोटींपेक्षाही जास्त ग्राहक आहे, जे ऑनलाइन बँकिंगचा वापर करतात. त्यामुळे कोणतीही कल्पना न देता अशा प्रकारे सेवा ठप्प होणं म्हणजे गंभीर आहे.
इतर बातम्या –
उद्धव ठाकरे राज्यपालांवर कडाडले, मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील मोठे मुद्दे
Gold Price: 3 दिवसांनी पुन्हा स्वस्त झालं सोनं, पाहा काय आहेत आजचे दर
Exclusive Video : हिंदुत्वाला प्रमाणपत्राची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना रोखठोक उत्तर@OfficeofUT @BSKoshyari #Hindutva pic.twitter.com/1N8Lt43gbw
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 13, 2020
(sbi online banking services has stop but atms are working breaking news)