SBI उद्यापासून देतेय 500 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त सोने खरेदीची संधी, हे 6 मोठे फायदे

| Updated on: Aug 29, 2021 | 12:55 PM

जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, ग्राहकांना सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीचे 6 मोठे फायदे सांगितलेत.

SBI उद्यापासून देतेय 500 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त सोने खरेदीची संधी, हे 6 मोठे फायदे
Sovereign Gold Bond
Follow us on

नवी दिल्लीः Sovereign Gold Bond Scheme: सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond)योजनेची सहावी सीरिज 30 ऑगस्ट 2021 पासून सुरू होत आहे. तुम्ही यामध्ये 3 सप्टेंबर 2021 पर्यंत गुंतवणूक करू शकता. सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) साठी इश्यू किंमत 4,732 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आलीय.

तर ही तुमच्यासाठी चांगली संधी

जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, ग्राहकांना सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीचे 6 मोठे फायदे सांगितलेत. एसबीआयच्या माध्यमातून गोल्ड बॉण्ड खरेदी केल्यावर तुम्हाला प्रति 10 ग्रॅम 500 रुपयांची सूट मिळेल.

ऑनलाईन किंवा डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट

सरकार गुंतवणूकदारांना 50 रुपयांची सूट देत आहे, जे ऑनलाइन अर्ज करतात आणि डिजिटल पेमेंट करतात. ऑनलाईन किंवा डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळेल. अशा स्थितीत तुम्ही 10 ग्रॅम सोन्यावर 500 रुपयांच्या सूटचा लाभ घेऊ शकता.

गोल्ड बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे

SBI ने आपल्या ग्राहकांना या गोल्ड बॉण्ड योजनेच्या फायद्यांविषयी माहिती देण्यासाठी ट्विट केलेय. एसबीआयने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, सोन्यात गुंतवणूक करण्याची योजना आहे का? सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond)मध्ये गुंतवणूक करण्याची 6 फायदेशीर कारणे येथे आहेत. एसबीआयचे ग्राहक http://onlinesbi.com वर ई-सेवेअंतर्गत या बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतात.

हे फायदे असतील

>> एश्योर्ड रिटर्न नेचर- सॉवरेन गोल्‍ड बाँडच्या गुंतवणूकदारांना दरवर्षी 2.5% दराने व्याज मिळेल. हे व्याज सहामाही आधारावर उपलब्ध होईल.
>> कॅपिटल गेन्स टॅक्समधून सूट: रिडीम्पशनवर कोणताही कॅपिटल गेन टॅक्स लावला जाणार नाही.
>> कर्ज सुविधा: कर्जासाठी कोलेटरल म्हणून वापरता येते.
>> स्टोरेजची समस्या नाही: सुरक्षित, फिजिकल गोल्डसारखी स्टोरेज समस्या नाही.
>> तरलता (लिक्विडिटी): एक्सचेंजवर व्यापार करू शकतो.
>> जीएसटीमधून सूट, मेकिंग चार्जेजमधून सवलत: फिजिकल गोल्डसारखे नाही, जीएसटी नाही आणि मेकिंग चार्जेस नाही.

कोणीही सॉवरेन गोल्‍ड बाँड योजनेत फक्त गुंतवणूक करू नये, तर त्याच्या परताव्यावर लक्ष ठेवावे, असंही SBI सांगत आहे. भारत सरकार समर्थित गोल्ड इन्वेस्टमेंट योजनेत गुंतवणूक करताना इतर बचत विचारात घेतली पाहिजे.

संबंधित बातम्या

LIC ची जीवन अमर पॉलिसी, फीचर्स चेक करा, तुमच्यासाठी किती फायदेशीर?

LIC ची जबरदस्त योजना: फक्त एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन 74300 रुपये पेन्शन मिळवा

SBI will offer Rs 500 per 10 grams of cheap gold from tomorrow, these are the 6 biggest benefits