मुकेश अंबानी आणि रिलायन्सवर सेबीची मोठी कारवाई; ‘या’ प्रकरणी ठोठावला 40 कोटींचा दंड

| Updated on: Jan 16, 2021 | 3:55 PM

उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीवर सेबीने 40 कोटींचा दंड ठोठावला आहे. (SEBI slaps fine of Rs 40 crore on Reliance Industries, Mukesh Ambani)

मुकेश अंबानी आणि रिलायन्सवर सेबीची मोठी कारवाई; या प्रकरणी ठोठावला 40 कोटींचा दंड
Mukesh Ambani
Follow us on

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीवर सेबीने 40 कोटींचा दंड ठोठावला आहे. 2007मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडने (आरपीएल) शेअर बाजारात कथित गडबड केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यानुषंगाने ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सेबीने आरपीएलवर 25 कोटी आणि मुकेश अंबानींसह इतर दोन कंपन्यांवर 15 कोटींचा दंड ठोठावला आहे. (SEBI slaps fine of Rs 40 crore on Reliance Industries, Mukesh Ambani)

आरपीएल आणि अंबानींशिवाय नवी मुंबई सेज प्रायव्हेट लिमिटेडवर 20 कोटी आणि मुंबई सेज लिमिटेडवर 10 कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हे प्रकरण 13 वर्षांपूर्वीचं म्हणजे 2007मधील आहे. आरपीएलच्या शेअरच्या रोख आणि फ्युचर खरेदीत मोठी गडबड झाली होती. कंपनीने मार्च 2007मध्ये आरपीएलमधील 4.1 टक्के भागीदारी विकण्याचा निर्णय घेतला होता.

सेबीने काय म्हटलं?

संबंधितांच्या शेअरमधील किंमतीतील गडबडीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांच्या विश्वासाला नेहमीच तडा जातो. त्यामुळे या कंपन्या बाजारातील होणाऱ्या हेराफेरीला सर्वाधिक प्रभावित करत असतात. त्यामुळेच सेबीला अशा प्रकारच्या हेराफेरीवर लक्ष ठेवून राहावं लागतं, असं या प्रकरणाची सुनावणी करणारे सेबीचे अधिकारी बी. जे. दिलीप यांनी त्यांच्या 95 पानी आदेशात म्हटलं आहे.

गुंतवणूकदरांचे नुकसान

अशा प्रकरणात सामान्य गुंतवणूकदारांचं नुकसान होतं, असं सेबीने म्हटलं आहे. वायदा आणि पर्यायी खंडच्या व्यवहारामागे आरआयएल आहे हे सामान्य गुंतवणूकदारांना माहीत नव्हतं. फसवणुकीच्या धंद्यामुळे त्याचा बाजारावर परिणाम झाला आणि सामान्य गुंतवणूकदारांनाही त्याचा फटका बसल्याचं सेबीने म्हटलं आहे. (SEBI slaps fine of Rs 40 crore on Reliance Industries, Mukesh Ambani)

 

संबंधित बातम्या:

नव्या वर्षात गॅसचा भाव वाढला आणि गावात पुन्हा चूलीचा धुराडा

म्यूच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; चार नियम बदलले

(SEBI slaps fine of Rs 40 crore on Reliance Industries, Mukesh Ambani)