SHARE MARKET: शेअर बाजारात घसरणीचं सत्र, सेन्सेक्स 866 अंकांनी गडगडला

| Updated on: May 06, 2022 | 7:41 PM

आज (शुक्रवारी) शेअर बाजारात सेन्सेक्स 866.65 अंक किंवा 1.56 टक्क्यांच्या घसरणीसह 54,835.58 वर बंद झाला. निफ्टी 1115.8 अंक किंवा 2 टक्क्यांच्या घसरणीसह 54,586.75 च्या टप्प्यावर बंद झाला.

SHARE MARKET: शेअर बाजारात घसरणीचं सत्र, सेन्सेक्स 866 अंकांनी गडगडला
घसरणीचे सलग 6 दिवस, शेअर बाजार गडगडला
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील (Share Market Update) घडामोडींचे परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आले. शेअर बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी घसरण नोंदविली गेली. सेन्सेक्स व निफ्टी 1.5 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती ही घसरणी मागील प्रमुख कारण सांगितली जात आहे. आज (शुक्रवारी) शेअर बाजारात सेन्सेक्स 866.65 अंक किंवा 1.56 टक्क्यांच्या घसरणीसह 54,835.58 वर बंद झाला. निफ्टी 1115.8 अंक किंवा 2 टक्क्यांच्या घसरणीसह 54,586.75 च्या टप्प्यावर बंद झाला. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (Repo rate hike) वाढ करण्याची घोषणा केली आहे. गृहकर्ज मागणीचा दर (Home Loan rate) मंदावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बांधकाम क्षेत्र संबंधित निर्देशांकात देखील आज घसरण दिसून आली. (Share market down by 866.65 points today know the today’s market update in Marathi)

मार्केट अपडेट

बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले, विप्रो, एचडीएफसी, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट शेअर्स मध्ये घसरण नोंदविली गेली. तर महिंद्रा, पॉवरग्रिड, आयटीसी, स्टेट बँक आणि एनटीपीसीमध्ये वाढ नोंदविली गेली. आजच्या व्यवहारात छोट्या शेअरमध्ये सर्वाधिक नुकसान पाहण्यास मिळालं. स्मॉलकॅप 100 पैकी 2.53 टक्के घसरण नोंदविली गेली. स्मॉलकॅप 50 मध्ये 2.4 टक्के आणि स्मॉलकॅप 250 मध्ये 2.27 टक्के घसरण नोंदविली गेली.

‘रेपो’चा परिणाम

शेअर बाजारात चौफेर घसरण नोंदविली गेली. रिझर्व्ह बँकेने रेपो दर फेररचने संबंधित केलेल्या घोषणेमुळे बाजारात घसरण दिसून आली. प्रमुख स्टॉक्समध्ये शेअर विक्रीचे सत्र दिसून आलं. रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो दरात 0.4 टक्के वाढीची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेची फेररचनेचा सर्वांना अनेपक्षित धक्काच होता. एप्रिलनंतर जून महिन्यात फेररचनेचा आढावा घेतला जाणार होता. मात्र, तत्पपूर्वीच रिझर्व्ह बँकेने घोषणा केली आहे.

हे सुद्धा वाचा

LIC IPO बंपर प्रतिसाद

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आयपीओला तिसऱ्या दिवशी देखील बंपर प्रतिसाद मिळाला आहे. आयपीओ तिसऱ्या दिवशी 1.23 पट सबस्क्राईब झाला आहे. काल (गुरुवारी) सार्वजनिक होण्याच्या दुसऱ्याच दिवशी आयपीओला 100% सबस्क्रिप्शन मिळाले होते. आतापर्यंत 16.2 कोटी शेअर्सच्या ऑफर साईझच्या तुलनेच 19.87 कोटी शेअरला बोली मिळाली आहे. पॉलिसीधारकांसाठी राखीव कोट्यातून 3.64 पट, कर्मचाऱ्यांच्या कोट्यातून 2.76 पट आणि रिटेल गुंतवणुकदारांच्या कोट्यातून 1.11 पट सबस्क्रिप्शन मिळालं आहे. आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम मध्ये 50% घटीसह 42 रुपयांवर पोहोचला आहे. मार्केटमधील अस्थिरतेमुळे प्रीमियममध्ये घसरण झाल्याचे सांगितलं जातं.