मुंबईः रशिया युक्रेन संघर्ष ( russia and ukren conflict) चालूच आहे. या वादाचा परिणाम सर्व स्तरावर प्रामुख्याने दिसून येत आहे. या संघर्षाचा विपरीत परिणाम सोमवारच्या दिवशी शेअर मार्केटवर सुद्धा दिसून आला.शेअर मार्केटमध्ये (share market) मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली.यंदाची ही चौथी वेळ आहे ,त्यामुळे बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. या चारही व्यवहारात गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. या व्यवहारांमध्ये 11.28 लाख कोटी रुपयांचा फटका देखील बसला आहे.बीएसई चे 30 शेअर वाल्या सेन्सेक्स( sensex) मध्ये सातत्याने चौथ्या दिवशी ही घसरणीचा सिलसिला चालूच आहे.1,491.06 अंकवरून म्हणजेच 2.74 टक्क्याने घटून 52,842.75 आकड्यावर आलेला आहे.दिवसात एकंदरीत व्यवहार चालू असताना सेन्सेक्स 1,966.71 आकडयावरून 3.61 च्या मोठ्या घसरणीने 52,367.10 आला. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरणच होत आहे.या घसरणीमुळे बीएसईच्या यादीतील कंपनीचे बाजार भांडवल चार दिवसात 11,28,214.05 कोटी रुपयांनी घसरून 2,41,10,831.04 कोटी रुपयांवर आले आहे.या चार दिवसांच्या व्यवहार सत्रात सेन्सेक्स 3,404.53 वरून 6.05 टक्क्याने खाली घसरला.
कच्चे तेल आणि जागतिक पातळीवरील घटना यामुळे सगळीकडे चढ-उतार पाहायला मिळत आहे. या सर्व परिणाम शेअर मार्केटवर प्रामुख्याने दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे आणि 2 टक्केपेक्षा अधिक घसरण दिसून येत आहे. रशियावर लावलेल्या निर्बंधांमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने बाजारात हालचाली दिसून येत आहे शिवाय या दोन्ही देशांमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत चाललेला आहे.हा तणाव कधी कमी होईल याची वाट सगळे जण पाहत आहेत.
रेलिगेयर ब्रोकिंग लिमिटेड चे वीपी – रिसर्च अजीत मिश्रा यांनी म्हटले की , आम्ही आशा करतो की, बाजारामध्ये लवकर स्थिरता निर्माण होईल यासाठी जागतिक बाजारपेठेवर अधिकाधिक बारीक लक्ष ठेवून ठेवणे गरजेचे आहे. लवकरच राज्यातील निवडणुकीचे एक्झिट पोल 10 मार्चला जाहीर होणार आहेत. या सर्व परिस्थितीचा परिणाम देखील भविष्यात सकारात्मक परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 5.76 टक्क्याने वाढून 124.7 डॉलर प्रति बॅरेल वर पोहचला आहे. कच्च्या तेलाचे दर 130 डॉलर प्रति बॅरेल पर्यंत पोहोचल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कमी झाल्याने बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल आणि दबाव देखील पाहायला मिळत आहे.
30 शेअर असणाऱ्या सेन्सेक्स मध्ये इंडसइंड बँक, एक्सिस बँक, मारुति सुजुकी, बजाज फाय नेंस, बजाज फिनसर्व, अल्ट्राटेक सीमेंट आणि महिंद्रा एंड महिंद्रा 7.63 टक्क्याने घसरले.या उलट भारती एयरटेल, एचसीएल टेक्नोलॉजीज, टाटा स्टील आणि इंफोसिस यांना काही प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला.बीएसई च्या सेक्टोरल इंडेक्स मध्ये रियल्टी,बँक, फायनेंस आणि ऑटो मोठ्या कपाती मुळे बंद पडले. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय बाजारपेठेत त्यांची विक्री सुरूच ठेवली आणि शुक्रवारी निव्वळ आधारावर 7,631.02 कोटी रुपयांचे शेअर विकले.
कच्च्या तेला मध्ये वाढ झाल्याने, महागाई ची वाढती संभवता, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे कमी झालेले मूल्य या सर्वांच्या धर्तीवर शेअर मार्केट बंद झाला. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 84 पैशांनी घसरून 77.01 बाजार बंद पडला.
संबंधित बातम्या
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला NMCची मान्यता, महापौरांच्या प्रयत्नांना यश
उत्तर प्रदेशाच्या निवडणुका संपल्या; आता पेट्रोल-डिझेल भडकणार; या दिवसांपासून दर वाढणार