Share Market Updates : शेअर मार्केटमध्ये घसरण, तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक

| Updated on: Dec 24, 2021 | 5:12 PM

तीन दिवसांच्या तेजीनंतर आता पुन्हा शेअर मार्केट(Share Market)ला ब्रेक लागलाय. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स (Sensex) 190 अंकांच्या (-0.33%) घसरणीसह 57,124च्या स्तरावर बंद झाला.

Share Market Updates : शेअर मार्केटमध्ये घसरण, तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक
रशिया-युक्रेनमधील संघर्षाचे मुंबई शेअर बाजारावर पडसाद
Follow us on

मुंबई : तीन दिवसांच्या तेजीनंतर आता पुन्हा शेअर मार्केट(Share Market)ला ब्रेक लागलाय. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स (Sensex) 190 अंकांच्या (-0.33%) घसरणीसह 57,124च्या स्तरावर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी (Nifty) 69 अंकांच्या (-0.40%) घसरणीसह 17,003 अंकांच्या स्तरावर बंद झाला.

दोन दिवस घसरण
या आठवड्यात बाजारात तीन दिवस तेजी होती, तर दोन दिवस घसरण होती. साप्ताहिक आधारावर या आठवड्यात सेन्सेक्सनं 2.83 टक्क्यांची घसरण नोंदवली. दोन आठवड्यांच्या सततच्या तेजीनंतर या आठवड्यात बाजारात मोठी घसरण झालीय. आज सेन्सेक्समधल्या टॉप-30 समभागांमधले 8 समभाग हिरव्या चिन्हात आणि उर्वरित 22 समभाग लाल चिन्हात बंद झाले.

आजचे टॉप गेनर्स आणि लूजर्स
आज एचसीएल टेक्नॉलॉजी, टेक महिंद्रा आणि एशियन पेंट्स सर्वाधिक वाढले, तर एनटीपीसी, पॉवरग्रिड आणि महिंद्रा अँड महिंद्रा सर्वात जास्त घसरले. आजच्या घसरणीसह, BSE सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 259.79 लाख कोटी रुपयांवर आले आहे.

EPFO : वाचवायचे असतील लाखो रुपये तर 31 डिसेंबरपूर्वी करा ‘ईपीएफओ’शी संबंधित ‘हे’ काम…

Insurance Premium : विम्याचा हप्ता वर्षभरात दुसऱ्यांदा वाढणार, काय आहे तज्ज्ञांचं मत?

WhatsApp News Emoji : व्हाट्सअॅपवर चॅटिंगची मजा होणार आणखी ‘रंगतदार’, इमोजीमध्ये आणणार व्हेरिएशन