मुंबई : भारतीय शेअर बाजारात (SHARE MARKET) घसरणीचं सत्र कायम राहिलं. सलग दुसऱ्या दिवशी प्रॉफिट बुकिंगचा (नफा वसुली) जोर कायम राहिल्यामुळे शेअर बाजारात पडझड झाली. सेन्सेक्स 566.09 अंकांच्या घसरणीसह 59610.41 वर बंद झाला. निफ्टी 149.75 अंकांच्या घसरणीसह 17807.65 वर पोहोचला. आज दिवसभर बँकिंग, आयटी शेइर्समध्ये विक्री दिसून आली. तर पॉवर, मेटल आणि तेल-गॅस मध्ये खरेदीचा जोर राहिला. बीएसईचा मिड कॅप (BSE MID-CAP) इंडेक्स 0.38 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स 0.39 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. आज आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये सरासरी 3 टक्क्यांची घसरण दिसून आली. गुंतवणुकदारांच्या प्रॉफिट बुकिंग धोरणामुळे काल (मंगळवार) एचडीएफसी बँक, बजाज फायनान्शियल्स सर्व्हिस आणि एचडीएफसीत सर्वाधिक घसरण झाली होती. रिलायन्समध्ये प्रॉफिट बुकिंगमुळे (PROFIT BOOKING) 1.41 टक्के घसरण नोंदविली गेली होती.
आज (बुधवारी) शेअर बाजाराचा कारभार सुरू होताच रुचि सोया (Ruchi Soya) शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदविली गेली. गुंतवणुकदारांनी शेअर विक्रीचा सपाटा लावल्याने Ruchi Soya चे शेयर 19% पर्यंत घसरले होते. कंपनीच्या व्यवस्थापनाने FPO नंतर शेअर विक्रीचा निर्णय घेतल्याचं वृत्त धडकलं होतं. एनएसई वर 13.75 टक्क्यांच्या घसरणीसह 755.25 रुपयांवर बंद झाले.
‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’द्वारे (एनपीसीआय) निर्मित ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ अर्थात ‘यूपीआय’चा वापर करून मोठ्या रकमेच्या शेअर खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शेअर खरेदीसाठी ‘यूपीआय’च्या सहाय्याने पाच लाख रुपयांपर्यंत पेमेंट करण्यास शेअर बाजार नियंत्रक ‘सेबी’नं ग्रीन सिग्नल दिला आहे. ही सुविधा येत्या एक मे पासून लागू होणार आहे.
यंदा नोकरीच्या प्रचंड संधी! PhonePay कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करणार, 2800 जणांना रोजगार मिळणार
Today’s gold-silver prices: सोन्याचे दर स्थिर; चांदीच्या दरात किंचित घसरण
पेट्रोल, डिझेल दर वाढीसोबतच पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या भावात वाढ