नवी दिल्ली: भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या आठवड्यात घसरण दिसून आली. रशिया-युक्रेन ( Russia Ukraine crisis) तणावपूर्ण परिस्थितीचा मोठा परिणाम चालू आठवड्यातील (Stock Market this week) शेअर बाजाराच्या कामगिरीवर झाला. गुंतवणुकदारांना तब्बल 10 लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागलं. अमेरिका व युरोपीय राष्ट्रांनी रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी पावलं उचलली. त्यामुळे आर्थिक रिकव्हरीवर मोठा परिणाम झाला. कच्च्या तेलाच्या किंमतींत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण झाला. त्यामुळे शेअर बाजारात शेअर्स विक्रीचं प्रमाण वाढलं. घसरणीसह बीएसईवर सूचीबद्ध (Listed) सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 249.97 लाख कोटी रुपयांच्या स्तरावर पोहोचले आहे. मागील आठवड्यात 260.48 लाख कोटी रुपयांच्या स्तरावर होते.
चालू आठवड्यात शेअर बाजारात 3 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली आणि सेन्सेक्स 2000 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. चालू आठवड्यादरम्यान निर्देशांकात 3.41 टक्क्यांची घसरण दिसून आली. निफ्टीमध्ये 3.57 टक्क्यांसह 600 अंकांनी गडगडला. गुंतवणुकदारांचे 10.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. घसरणीसह बीएसईवर सूचीबद्ध (लिस्टेड) सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 249.97 लाख कोटी रुपयांच्या स्तरावर पोहोचले आहे. मागील आठवड्यात 260.48 लाख कोटी रुपयांच्या स्तरावर होते.
चालू आठवड्यात शेअर बाजारात घसरणीचं चित्र होतं. रशियाच्या हल्ल्याच्या वृत्तानंतर 24 फेब्रुवारीला बाजारात घसरण दिसून आली आणि सेन्सेक्स 57232 वरुन 54529 अंकांवर जाऊन पोहोचला. तर दुसऱ्याच दिवशी बाजारात रिकव्हरी दिसून आली आणि सेन्सेक्स पुन्हा एकदा 55800 च्या स्तरावर जाऊन पोहोचला. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत एफआयआयने इक्विटीमध्ये 41 हजार कोटी रुपये आणि देशांतर्गत गुंतवणुकदारांत 38 हजार कोटींची विक्री दिसून आली.
चालू आठवड्यात शेअर बाजारात विक्रीचं चित्र होतं. शेअर बाजाराची सेक्टर निहाय कामगिरी पुढीलप्रमाणं दिसून आली.
• निफ्टी मीडिया (-7.6%)
• सार्वजनिक बँक (-5.7%)
• ऑटो सेक्टर (-4.6%)
• बीएसई स्मॉल (-4.6%)
• बीएसई मिड-कॅप (-2.5%)
• लार्ज कॅप इंडेक्स (-3.3%)
गेल्या आठवड्याभरात युक्रेन-रशिया वादाचे पडसाद भारतासह आंतरराष्ट्रीय अर्थजगतावर उमटले होते. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनानंतर वातावरणातील तणाव निवळला होता. पश्चिमी देशांसोबत चर्चेची दारं खुली असल्याचं निवेदन केलं होतं. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण नोंदविली गेली. सध्या कच्च्या तेलात 2.55 टक्क्यांची घसरण दिसून आली आणि 101.21 डॉलर प्रति बॅरल वर तेलाचे व्यापार सुरू आहेत. मात्र, पुन्हा एकदा वादानं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांवर अनिश्चिततेचं सावट आहे.
इतर बातम्या:
Video : रशियन टँकनं अचानक ट्रॅक बदलला, समोरुन आलेल्या कारला चिरडलं, नेमकं काय घडलं?