मध्यंतरी तेल कंपन्यांनी(Oil Companies) सर्वसामान्य नागरिकांचं चांगलंच तेल काढलं. खाद्यतेल (Edible Oil) आणि केसांसाठीच्या तेलाचेही भाव वाढले. त्यामुळे प्रत्येकाचं बजेट कोलमडलं. पूर्वीच्या किराणा यादीत येणा-या सामानासाठी आता जादा दाम मोजावे लागले. पण या नुकसानीची भरपाई (Compensation for damages) तुम्हाला करता येणार आहे. सफोला (Saffola) आणि पॅराशूट (Parachute) या तेलाने जवळपास प्रत्येक घरात एंट्रीच केली नाही तर एक खास जागा ही मिळवली आहे. पर्सनल केअर कंपनी मॅरिकोने (Marico) व्यापारी वृद्धी नोंदवली आहे. तसेच कंपनी भविष्य्यातही चांगला कारभार करण्याची शक्यता आहे. बाजार तज्ज्ञांचा सल्ला गृहित धरला तर या कंपनीचा शेअर सध्या स्वस्त मिळत आहे आणि भविष्यात यामध्ये तेजी असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बीएसई निर्देशांकावर (BSE Sensex) सध्या या शेअरची किंमत 496.05 रुपये आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) यांच्या सल्ल्यानुसार, हा शेअर गुंतवणूकदारांना जवळपास 21 टक्क्यांचा फायदा क देणार आहे. मोतीलाल ओसवाल यांनी या शेअरसाठी 600 रुपयांचे लक्ष्य निर्धारीत केले आहे.
मॅरिको कंपनीचा व्यापार जगभर पसरला आहे. भारताशिवाय या कंपनीचे उत्पादने बांग्लादेश, इजिप्त, मलेशिया, मध्यपूर्व देश, दक्षिण अफ्रिका यासह इतर अनेक भागात वितरीत होतात. या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये काव्या यूश, पॅराशूट, सफोला हनी, सेट वेट, पॅराशूट बॉडी लोशन, सफोला तेल, लिवोन आणि मेडिकर यासारखे महत्वाचे ब्रँड आहेत.
2015 ते 2020 या आर्थिक वर्षात या कंपनीची विक्री 6 टक्क्यांनी वाढली आहे. तर 2020 ते 2024 या आर्थिक वर्षात या कंपनीने विक्रीत प्रचंड गती मिळवली आहे. कोरोना आणि इतर अनेक संकंटे असतानाही कंपनीने ग्रोथ ट्रॅक जोरदार ठेवला आहे. या वर्षात कंपनी विक्रीत दोनअंकी धाव घेईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ही कंपनी पहिल्या रेंजमध्ये 450 ते 500 कोटी रुपयांचे लक्ष्य सहज गाठेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
विविधीकरण अर्थात विविध कंपन्यांच्या जोरावर ही कंपनी येणा-या काळात फायदा कमावेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. या कंपनीची एर्निंग ग्रोथही खूप चांगली आहे. त्यामुळेच मोतीलाल ओसवाल यांनी या शेअरसाठी 600 रुपयांचे लक्ष्य निर्धारीत केले आहे.
मॅरिकोचा शेअर गेल्या वर्षी स्टॉक मार्केटमध्ये तेजीत होता. या शेअरचा भाव 18 ऑक्टोबर 2021 रोजी 606 रुपये होता. हा या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक होता. परंतू या स्तरावर हा शेअर खूप काळ थांबू शकला नाही आणि त्याची पडझड झाली. उच्चांक स्थापन करणा-या या शेअरने 27 वर्षातील त्याचा सर्वात वाईट काळ पाहिला. हा शेअर 496.05 रुपयांवर येऊन ठेपला. ही आतापर्यंतच त्याची निच्चांकी कारकीर्द होती.
(विशेष सूचनाः हा केवळ अंदाज आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि अभ्यास करूनच गुंतवणूक करावी. )