नवी दिल्ली : आज क्रिप्टोकरन्सीच्या किमतीत घसरणीचा कल आहे. बिटकॉइन $63,000 च्या खाली पोहोचले. Bitcoin बाजारमूल्यानुसार जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी 6 टक्क्यांनी घसरत आहे आणि $62,054 वर आलीय. बिटकॉईनने अलीकडेच सुमारे $69,000 चा विक्रमी उच्चांक गाठला. त्यात यंदा 114 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. चिनी क्रिप्टोकरन्सी क्रॅकडाऊनदरम्यान जूनमध्ये बिटकॉइन $30,000 च्या खाली गेले. यानंतर त्यात वसुली दिसून आली.
Ether Price: त्याचप्रमाणे, दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी इथर देखील 6 टक्क्यांनी घसरली आहे आणि ती $4,400 वर आली आहे. इथरमध्येही बिटकॉइनप्रमाणे वाढ झाली.
Dogecoin Price: (CoinDesk) अहवालानुसार, Dogecoin $ 0.25 वर व्यापार करत आहे, 4 टक्क्यांपेक्षा कमी.
Shiba Inu: शिबा इनू 2 टक्क्यांहून अधिक तुटले असून ते $0.000051 वर गेले आहे.
Litecoin, XRP, Polkadot, Uniswap, Stellar, Cardano आणि Solana मध्ये गेल्या 24 तासात घसरण झाली.
अशा परिस्थितीत पडलेल्या बाजारात पैसे गुंतवून तुम्ही नफा मिळवू शकता. क्रिप्टोकरन्सीची आजची किंमत लवकर श्रीमंत होण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही फक्त एका दिवसात लाखोंचा नफा कमवू शकता.
? ही एक केंद्रीकृत मालमत्ता आहे. आतापर्यंत यासंदर्भात कोणतेही नियम नाहीत. अशा स्थितीत सरकारकडून या संदर्भात आतापर्यंत कोणताही हस्तक्षेप झालेला नाही. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचे त्यांच्या गुंतवणुकीवर पूर्ण नियंत्रण असते.
? संपूर्ण जगात क्रिप्टोकरन्सी स्वीकारली जाते. हे कोणत्याही देशाच्या सीमांच्या आधारावर विभागलेले नाही. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे क्रिप्टोकरन्सी असेल, तर तुम्ही ती संपूर्ण जगात वापरू शकता.
?क्रिप्टो एक्सचेंज 24 तास आणि 7 दिवस काम करतात. स्टॉक मार्केट एक्स्चेंजप्रमाणे, ते आठवड्यातून फक्त पाच दिवस आणि सकाळी 9.15 ते दुपारी 3.35 पर्यंत काम करत नाही. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओमध्ये कोणताही बदल हवा तेव्हा करू शकतो. तो खरेदी आणि विक्रीही कधीही करू शकतो.
? क्रिप्टोकरन्सीला कोणत्याही वित्तीय संस्थेचे समर्थन नाही. तसे ते नियमन केलेले नाही. यामुळेच एखादा गुंतवणूकदार यात अडकला तर त्याला मदत करणारे कोणीच नसते. आपली फसवणूक झाली तरी मदत मिळण्याची सक्यता नसते. अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या सुरक्षेची जबाबदारी तुमचीच आहे.
? ही एक डिजिटल मालमत्ता आहे. अशा परिस्थितीत, सायबर गुन्हेगार ते हॅक करू शकतात आणि ते तुमच्या वॉलेटमधून चोरू शकतात. हा सर्वात मोठा धोका आहे. हे तंत्रज्ञान अजून खूप नवीन आहे. तुम्हाला क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करायची असेल तर पोर्टफोलिओचा एक छोटासा भाग त्यात ठेवा.
?क्रिप्टोकरन्सीची दुसरी समस्या म्हणजे अस्थिरता. त्याची किंमत खूप लवकर वाढते आणि खूप लवकर पडते. अशा परिस्थितीत जर तुम्ही चुकीच्या वेळी प्रवेश केला तर घाबरण्याची गरज नाही. योग्य वेळेची वाट पहा आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार बना.
संबंधित बातम्या
जागतिक संकेतांमुळे सोन्याच्या किमतीत किरकोळ वाढ, चांदीही स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव
‘या’ पोस्ट ऑफिस योजनेत दररोज 95 रुपये जमा करा, मॅच्युरिटीवर मिळणार 14 लाख