नवी दिल्लीः भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या (75th Independence Day) निमित्ताने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना भाड्यातून स्वातंत्र्य मिळण्यासाठी गृह कर्जावर (Home loan) शून्य प्रक्रिया शुल्कची ऑफर देत आहे. एसबीआयने एका ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. एसबीआयने ट्विटमध्ये लिहिले, ” या स्वातंत्र्य दिनी तुमच्या स्वप्नांच्या घरात पाऊल टाका, आता शून्य प्रोसेसिंग फीसह होम लोनसाठी अर्ज करा. या व्यतिरिक्त देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI कडून महिलांना गृहकर्जावर अतिशय आकर्षक सवलत सुविधेचा लाभ दिला जात आहे. गृहकर्ज सुविधेंतर्गत महिलांना व्याजदरात 5 बेसिस पॉइंटच्या सूटचा लाभ दिला जात आहे.
त्याच वेळी जर तुम्हाला एसबीआयच्या योनो सेवेअंतर्गत गृहकर्ज घ्यायचे असेल, तरीही तुम्हाला 5 बीपीएस व्याज सवलतीचा लाभ मिळेल. एसबीआय होम लोन व्याजदर 6.70 टक्के आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना 6.70 टक्के व्याजदराने 30 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज देत आहे. 30 लाख ते 75 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर 6.95 टक्के व्याजदर असेल. 75 लाखांवरील गृहकर्जावरील व्याजदर फक्त 7.05 टक्के असेल.
This Independence Day, step into your dream home, with ZERO* processing fee on Home Loans. Apply Now: https://t.co/N45cZ1DqLD #SBIHomeLoan #FreedomFromRent #SBI #StateBankOfIndia #AzadiKaAmrutMahotsav pic.twitter.com/Gs2qunIDwL
— State Bank of India (@TheOfficialSBI) August 13, 2021
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोहिमेअंतर्गत एसबीआयच्या या आकर्षक गृहकर्जाची सुविधा 15 ऑगस्टला मिळू शकते. एसबीआयची डिजिटल सेवा योनो एसबीआयद्वारे गृहकर्जासाठी अर्ज करता येतो. याशिवाय एसबीआयने 7208933140 हा क्रमांक जारी केलाय. गृहकर्जासाठी व्यक्ती या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकतात.
बँकेच्या ग्राहकाने कर्ज घेताना कोणत्या प्रकारच्या अडचणी येत आहेत हे सांगितले. बँक कोणत्या आधारावर कर्ज देत नाही, यानंतर एसबीआयने ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच कर्ज मंजुरी अनेक घटकांवर अवलंबून असते, ज्यात उत्पन्न, माल तारण, चालू कर्ज, क्रेडिट इतिहास, व्यवहार्यता इत्यादींचा समावेश आहे. या गोष्टींची काळजी घेतली जाते.
संबंधित बातम्या
PNB ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील महिन्यापासून मोठा बदल, ग्राहकांवर काय परिणाम?
तुम्हीसुद्धा LIC ची पॉलिसी घेतली असल्यास व्हा सावध, अन्यथा पैसे बुडणार, जाणून घ्या का?
Special offer on 75th Independence Day Home Loan from SBI, Learn how to apply