Amul Franchisee Registraion : अमूलसोबत अशाप्रकारे सुरू करा व्यवसाय, होईल एवढी कमाई

| Updated on: Jul 23, 2021 | 5:48 PM

कमाईबद्दल बोलायचे झाले तर रेसिपी बेस्ड आईस्क्रीम, मिल्कशेक, पिझ्झा, बर्गर, सँडविच या वस्तूंवर 50 टक्क्यांपर्यंत मार्जिन उपलब्ध आहे. विक्रीचे लक्ष्य गाठल्यानंतर कंपनीला विशेष प्रोत्साहनचा लाभ स्वतंत्रपणे मिळतो.

Amul Franchisee Registraion : अमूलसोबत अशाप्रकारे सुरू करा व्यवसाय, होईल एवढी कमाई
Follow us on

Amul Franchisee registration : जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर अमूल डेअरीने आपल्यासाठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. अमूल हा एक असा डेअरी ब्रँड आहे जो घरा-घरात पोहोचला आहे. याची डझनभर उत्पादने आहेत आणि व्यवसाय मॉडेलच्या दृष्टीने, हे असे एक क्षेत्र आहे जेथे मागणी नेहमीच असते. यामधील गुंतवणूक खूपच कमी आहे आणि पहिल्या दिवसापासूनच आपली कमाई सुरू होते. (Start a business with Amul like this, earn as much as you can)

अमूलच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार दूध, ब्रेड, चीज, चीज सॉस, पनीर, वेबरज, दही, आईस्क्रीम, तूप, दूध पावडर, चॉकलेट, फ्रेश क्रीम, मिठाई, हॅपी ट्रीट, अमूल पीआरओ, बेकरी उत्पादने यासारखी डझनभर उत्पादने उपलब्ध आहेत. आपण कंपनीच्या वेबसाईटला भेट दिल्यास आपणाला फ्रेंचाइझीची जाहिरात दिसेल. जाहिरातीमध्ये सांगितले आहे की, आपणास याची फ्रेंचायझी पाहिजे असेल तर 022-68526666 या क्रमांकावर मेल करा किंवा कॉल करा. हा अधिकृत ग्राहक सेवा क्रमांक आहे.

सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत करा कॉल

सोमवारी ते शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हा नंबरवर कॉल केला जाऊ शकतो. फ्रँचाइझी देण्यासाठी कंपनी 25,000 रुपये रिफंडेबल सुरक्षा शुल्क देखील घेते. हे पैसे चेक किंवा ड्राफ्टच्या मदतीने द्यावे लागतील. कंपनी वारंवार विनंती करत आहे की, अनेक बनावट वेबसाईट्स अमूलच्या नावावर लोकांची फसवणूक करीत आहेत, त्यामुळे ऑनलाईन ट्रान्सफर करू नका. येथे प्रत्येक प्रक्रियेसाठी ग्राहक सेवा कॉल करण्याचे आवाहन केले जात आहे.

25 हजार रुपये रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट

अमूलच्या प्रामुख्याने दोन प्रकारची फ्रँचायझी आहेत. प्रथम प्राधान्य आउटलेट(Outlet) आहे, ज्यास रेल्वे पार्लर(Railway Parlour) किंवा कियॉस्क (Kiosk) देखील म्हटले जाते. हे पार्लर उघडण्यासाठी, 100-150 चौरस फूट क्षेत्र आवश्यक आहे. 25,000 रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट आहे. याशिवाय फर्निचर व वर्किंग कॅपिटल म्हणून जास्तीत जास्त 2 लाख रुपये घेतले जातील. फ्रीजर सारखी काही उपकरणेही खरेदी करण्याची गरज आहे. यानंतर दुकान सुरू केले जाऊ शकते. दुधाच्या प्रत्येक पाउचवर 2.5 टक्के मार्जिन उपलब्ध आहे. चीज, लोणी, लस्सी, तूप, मलई अशा उत्पादनांवर 10 टक्के मार्जिन उपलब्ध आहे. आईस्क्रीम सारख्या उत्पादनांवर 20 टक्के मार्जिन उपलब्ध आहे.

स्कूपिंग पार्लरसाठी अधिक गुंतवणूकीची आवश्यकता

अमूलचे दुसरे फ्रेंचाइजी मॉडेल अधिक गुंतवणूकवाले आहे. याला अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर म्हणतात. यासाठी किमान क्षेत्र देखील 300-350 चौरस फूट असावे. यात 50 हजार इतके सिक्युरिटी डिपॉझिट जमा करावे लागते. हे पार्लर उघडण्यासाठी किमान 5-6 लाखांची किमान गुंतवणूक असते.

50 टक्क्यांपर्यंत मिळते मार्जिन

कमाईबद्दल बोलायचे झाले तर रेसिपी बेस्ड आईस्क्रीम, मिल्कशेक, पिझ्झा, बर्गर, सँडविच या वस्तूंवर 50 टक्क्यांपर्यंत मार्जिन उपलब्ध आहे. विक्रीचे लक्ष्य गाठल्यानंतर कंपनीला विशेष प्रोत्साहनचा लाभ स्वतंत्रपणे मिळतो. एकंदरीत, जर कोणी अमूल फ्रेंचाइझी किंवा दुकान उघडले, तर विक्री किती आहे यावर कमाई अवलंबून असते. जर जागा आपली असेल तर भाडे आकारले जाणार नाही. जर विक्री अधिक असेल तर मिळकतही अधिक होईल. सर्वात कमी मार्जिन दुधाच्या पॅकेटवर आहे. टोन्ड दुधाच्या एका पॅकेटची किंमत 49 रुपये आहे. अशा परिस्थितीत दुधाच्या पॅकेटच्या विक्रीवर त्यांची कमाई 1.25 रुपयांच्या जवळपास आहे. (Start a business with Amul like this, earn as much as you can)

इतर बातम्या

VIDEO: काल इथे गाव होतं… डोंगराच्या आडोशाला गेले आणि…; तळीयेची दुर्घटना नेमकी कशी घडली?; वाचा सविस्तर

Sangli Flood : कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर, सांगली जिल्ह्यातील 25 मार्ग पाण्याखाली, वाहतूक ठप्प