कोरोनाच्या भीषण काळात आता प्रत्येकजण नोकरी सोडून व्यवसायाकडे वळलं आहे. यासाठी आम्हीही तुम्हाला एक उत्तम बिझनेस आयडिया सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही कमी गुंतवणुकीवर बक्कळ पैसे कमवू शकता. चहापत्ती एक असं प्रोडक्ट आहे ज्याचा प्रत्येक घरात रोज वापर होतो. म्हणून जर तुम्ही याचा व्यवसाय सुरू केला तर बराच नफा कमवू शकता.
श्रीमंत किंवा गरीब प्रत्येकजण हे उत्पादन वापरतो. सुरुवातीला एका छोट्या लेबलवरुन आपण ते एका मोठ्या व्यवसायात रूपांतरित करू शकता.
आपल्या देशातील बर्याच भागात चहाची लागवड केली जाते. आसाम आणि दार्जिलिंगच्या चहाची पाने सर्वोत्तम मानली जातात. त्याची मागणी फक्त भारतातच नाही तर परदेशातही आहे. आपल्याला चहाच्या पानांचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आसाम आणि दार्जिलिंग चहाचा व्यवसाय तुम्हीही करू शकता.
चहापत्तीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 हजार ते 10 हजार रुपये लागतील. चहाच्या पानाचा व्यवसाय कमी पैशात सुरू करून आपण हळू हळू चांगले पैसे मिळवून व्यवसाय वाढवू शकता.
हा व्यवसाय अनेक प्रकारे केला जाऊ शकतो - आपण हा व्यवसाय बर्याच प्रकारे करू शकता. बाजारात एखादे दुकान घेऊन आपण घाऊक आणि किरकोळ चहाची विक्री करू शकता. हा व्यवसाय मोठ्या शहरांमध्ये चांगला चालतो.
या व्यतिरिक्त बर्याच ब्रांडेड कंपन्या खुलीचहा अशी फ्रँचायझीदेखील देतात. आपण फ्रँचायझी घेवून हे काम सुरू करू शकता. यासाठी मोठ्या बजेटची आवश्यकता असेल.
जर आपण एखादे दुकान किंवा कोणत्याही ब्रांडेड कंपनीची फ्रेंचायजी घेऊन हा व्यवसाय करू शकत नाही तर घरातूनच चहापत्तीचा व्यवसाय सुरू करू शकता.
जर तुम्हाला कमी बजेटमध्ये चहाच्या पानांचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही घाऊक दरात चहाची पाने विकत घेऊ शकता आणि वेगवेगळ्या आकारातील प्लास्टिकच्या पाकिटात पॅक करू शकता आणि ते घरोघरी विकू शकता. जे स्वस्त असल्यामुळे लोकांना आवडेल.
प्रत्येक महिन्याला 20 हजारांपर्यंत उत्पन्न - तुम्हाला प्रतिकिलो 140 ते 180 रुपये दराने चांगल्या प्रतीची चहा मिळेल. जी तुम्ही प्रति किलो 200 ते 300 रुपये दराने बाजारात विकू शकता. जर तुम्ही दररोज सरासरी 10 किलो चहाची पाने विकली तर 600 रुपये वाचवाल. सुरुवातीला तुम्ही दरमहा 15 ते 20 हजार रुपये सहज कमावू शकता.
मार्केटिंगच्या माध्यमातून वाढवू शकता व्यवसाय - तुम्हाला याचा जर ब्रँड बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कंपनीची नोंदणी करावी लागेल. याशिवाय चांगल्या प्रतीची पॅकेजिंगदेखील करावी लागेल. तसेच तुम्ही जाहिराती करून आपला व्यवसाय वाढवू शकता.