मुंबई: तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायात नशीब आजमवायला हरकत नाही. शेतीसोबतच्या जोडधंद्यातून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमावू शकता. अशाच एका जोडधंद्यापैकी एक म्हणजे शेळीपालन. शेळीपालनासाठी थोड्याफार भांडवालाची व्यवस्था करुन तुम्ही महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न कमावू शकता.
तुम्ही घराबाहेरील मोकळ्या जागेतच हा व्यवसाय सुरु करु शकता. सध्याच्या काळात उत्तम फायदा मिळवून देणाऱ्या व्यवसायांमध्ये शेळीपालनाचा समावेश आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून शेळीपालनाचा पर्याय स्वीकारत आहेत.
हा व्यवसाय सुरू करणे खूप सोपे आहे. तुम्ही हे सरकारी मदतीने सुरू करू शकता. ग्रामीण भागात पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्वयंरोजगाराचा अवलंब करण्यासाठी, हरियाणा सरकार पशुपालकांना 90 टक्के पर्यंत अनुदान देत आहे. त्याचबरोबर इतर राज्य सरकारेही अनुदान देतात. भारत सरकार पशुपालनावर 35% पर्यंत अनुदान देते. तुमच्याकडे शेळीपालन सुरू करण्यासाठी पैसे नसले तरी तुम्ही बँकांकडून कर्ज घेऊ शकता. शेळीपालनासाठी कर्ज देण्यासाठी नाबार्ड उपलब्ध आहे.
आम्ही तुम्हाला सांगू की शेळीच्या दुधापासून ते मांसापर्यंत मोठी कमाई होते. बाजारात शेळीच्या दुधाला खूप मागणी आहे. तर बकऱ्याचे मांस सेवन करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या मांसाला सातत्याने मागणी असते. शेळीपालन प्रकल्प हा अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे. एका अहवालानुसार, 18 मादी शेळ्यांवर सरासरी 2,16,000 रुपये उत्पन्न मिळू शकते. त्याचवेळी बकऱ्यांच्या विक्रीतून सरासरी 1,98,000 रुपये मिळू शकतात.
त्यशेतीच्या व्यवसायात तुम्ही वर्षाला 25 हजारांची गुंतवणूक करून महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न कमावू शकता. अनेक राज्यांमध्ये सरकार मत्स्य व्यवसायालाही प्रोत्साहन देत आहे. मत्स्य उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगड सरकारने त्याला शेतीचा दर्जा दिला आहे. याशिवाय, राज्य सरकार मत्स्य उत्पादकांना बिनव्याजी कर्ज सुविधा देत आहे. यासोबतच सरकारकडून मच्छीमारांसाठी अनुदान आणि विमा योजनाही उपलब्ध आहे.
जर तुम्हीही मत्स्यपालनाच्या व्यवसायात असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर त्याचे आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला भरपूर नफा देऊ शकते. सध्याच्या काळात बायोफ्लोक तंत्र मत्स्यपालनासाठी खूप प्रसिद्ध होत आहे. अनेक लोक या तंत्राचा वापर करून लाखोंची कमाई करत आहेत.
संबंधित बातम्या:
मत्स्यपालन ठरेल आर्थिक कमाईचा राजमार्ग, पेंग्बा मासे विक्रीतून एक व्यक्ती 45 लाखांची उलाढाल करतेय
भात शेतीमध्ये मत्स्यपालन करुन दुप्पट कमाईची संधी, फिश राईस फार्मिंग नेमकं काय?
मत्स्यपालनासाठी बिनव्याजी कर्ज, शेतीचा दर्जा मिळणार, ‘या’ राज्याचा मोठा निर्णय