मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल 422.83 अकंनी घसरून 56,701.48 अकांवर पोहोचला. तसेच निफ्टीमध्ये देखील 128.40 अकांची घट झाली आहे. सध्या निफ्टी 16,875.35 अकांवर आहे. दरम्यान गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देखील सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घट झाली होती. हा आठवडा गुंतवणुकदारांसाठी काही अंशी निराशजनकच राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
दरम्यान दुसरीकडे गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देखील शेअर बाजारामध्ये घसरण झाल्याचे पहायाला मिळाले होते. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेंक्स 191 अकांनी घसरून 57,124.31 अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी 68.85 अंकाच्या घसरणीसह 17,003.75 अंकांवर बंद झाला होता. आज सोमवारी शेअर बाजार सुरू होताच पुन्हा एकदा कोसळला आहे. अनेक कंपन्यांच्या शेअरला याचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
सोमवारी पावरग्रीड, सनफार्मा, डी. रेड्डी, एनटीपीसी आणि एम& एम या कंपन्याच्या शेअरमध्ये काही अंशी तेजी दिसून आली, तर दुसरीकडे टीसीएस, एलटी, विप्रो, एचडीएफची बँक, भारती एअरटेल, आसीआसीआय बँक यांचे शेअर्स कोसळले आहेत. सलग दोन दिवस शेअरबाजारामध्ये होत असलेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक वाढली; वर्षभरात 24 टक्क्यांची वाढ, ‘ही’ आहेत प्रमुख कारणे
बेरोजगारांना मोठा दिलासा! नव्या वर्षात रोजगार वाढणार; जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ
Income Tax Return Filing : आतापर्यंत 4.43 कोटींपेक्षा अधिक आयकर रिटर्न दाखल