नवी दिल्लीः LPG Subsidy : गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य जनता महागाईने प्रचंड हैराण झालीय. विशेषतः घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपयांवर जाऊन पोहोचलीय. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडलेय. कोरोनाच्या काळात गेल्या काही काळापासून जनतेला बँक खात्यात अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. पण आता तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. ज्यांना गेल्या अनेक दिवसांपासून सबसिडीचे पैसे मिळालेले नाहीत, त्यांना केंद्र सरकार ते पुन्हा देण्याचा विचार करीत आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलवर करात सूट दिल्यानंतर केंद्र सरकार स्वयंपाकघरात राबणाऱ्या गृहिणींना काहीसा दिलासा देऊ शकते.
भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडे एक प्रस्ताव आलाय, ज्यावर सध्या चर्चा होऊ शकते. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, सध्या झारखंड, ईशान्येकडील राज्ये, छत्तीसगड, मध्य प्रदेशचे आदिवासी भाग, झारखंड आणि अंदमानमध्ये एलपीजीवर सबसिडी दिली जात आहे. पण केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, लवकरच संपूर्ण देशात एलपीजीवरील सबसिडी पुन्हा सुरू होऊ शकते.
ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून गॅस डीलर्सना मिळालेल्या संकेतांनुसार सरकार एलपीजी सिलिंडरवर 303 रुपयांपर्यंत सूट देण्याचा विचार करीत आहे. जर तुम्हाला सध्या 900 रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर मिळत असेल तर तो तुम्हाला 587 रुपयांपर्यंत मिळू शकेल. शेवटच्या वेळी हे अनुदान 2020 च्या एप्रिलमध्ये 147.67 रुपये मिळाले होते. पण तेव्हा घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 731 रुपये होती, जी सबसिडीनंतर 583.33 रुपये मिळत होती. म्हणजेच तेव्हापासून आतापर्यंत घरगुती गॅस सिलिंडर 205.50 रुपयांनी तर व्यावसायिक सिलिंडर 655 रुपयांनी महागला.
तुमच्याकडे गॅस कनेक्शन असल्यास तुमचा आधार कार्ड नंबर तुमच्या गॅस कनेक्शनशी लिंक करावा लागेल. असे केल्यास तुम्हाला अनुदानाचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील. असे अनेक मार्ग आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा आधार क्रमांक तुमच्या गॅस कनेक्शनशी जोडू शकता किंवा लिंक करू शकता.
जर तुमचे गॅस कनेक्शन मोबाईलशी लिंक असेल तर आधी ते निवडा
लिंक नसल्यास 17 अंकी LPG आयडी प्रविष्ट करा
एलपीजी आयडी टाकल्यानंतर त्याची पडताळणी करा आणि सबमिट करा
बुकिंगच्या तारखेसह सर्व माहिती भरा, त्यानंतर तुम्हाला सबसिडीची माहिती दिसेल
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ग्राहक सेवा क्रमांक 1800-233-3555 वरून देखील माहिती मिळवू शकता
केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारीपासून सबसिडी सुरू होऊ शकते. एप्रिल 2020 पासून सबसिडी बंद आहे. गेल्या वर्षी एप्रिलपर्यंत गेल्या वेळी 145.67 रुपये अनुदान मिळाले होते. तेव्हा सिलिंडर 583.33 रुपयांना मिळत होता.
संबंधित बातम्या
BHSeries – काय आहे भारत सिरीज; कोणाला होणार फायदा?, वाचा सविस्तर
PM Awas Yojana 2021: पीएम आवासांतर्गत 3.61 लाख घरांना मंजुरी; ‘असा’ करा अर्ज