नवी दिल्ली : कार प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे, देशामधील प्रमुख कार निर्मिती कंपनी टाटा मोटर्सने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक जानेवारीपासून नवे दर लागू होणार आहेत. याबाबत बोलताना कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, कच्च्या मालाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे, तसेच महागाई देखील वाढल्याने दरवाढीचा निर्णय घ्यावा लागत आहे. येत्या एक जानेवारीपासून सर्वच वाहनांच्या किमतीमध्ये अडीच टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे.
समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे देशातील प्रमुख कार निर्मिती कंपनी असलेल्या टाटाने वाहनांच्या किमती 2.5 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक जानेवारीपासून नवे दर लागू होणार आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक चिफचा तुटवडा आहे. त्यामुळे वाहनांचे उत्पादन बाधित झाले आहे. आता त्यात भरीसभर म्हणजे वाहनांच्या निर्मितीसाठी लागणार कच्चा माला देखील महागाला आहे. वाहनाच्या निर्मितीसाठी लागणार कच्चा माल मोठ्याप्रमाणात आपल्याला आयात करावा लागतो. आंतराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या किमतीमध्ये वाहन विक्री करणे आता कंपन्यांना परवडत नसून, वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान टाटापाठोपाठ इतर कंपन्या देखील वाहनांच्या किमतीमध्ये वाढ करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वाहन निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेले स्टील, अॅल्यूमिनियम, इलेक्ट्रॉनिक चिफ, अशा सर्वच कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. महागाई वाढल्याने कामगारांचे वेतन वाढवण्याचा दबाव देखील आहे. तसेच कोरोना काळात सर्वच कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. उत्पादनाचे भाव वाढून, कोरोनाकाळात झालेला तोटा काहीप्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न देखील कंपन्यांकडून सूरू असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इतर वाहन कंपन्या देखील दर वाढू शकतात.
इंधनाचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
‘एससीएसएस’मध्ये गुंतवणूक केल्यास होईल मोठा फायदा; जाणून घ्या काय आहे योजना?