मुंबई : टाटा ग्रुपचे (Tata Group) अध्यक्ष एन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांनी एक घर (Home) विकत घेतले आहे. या घराची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एन चंद्रशेखरन यांनी तब्बल 98 कोटी रुपये देऊन हा डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. या डुप्लेक्स फ्लॅटचा स्केअर फुटाने हिशोब करायचा झाल्यास हा फ्लॅट सहा हजार स्क्वेअर फूटांचा आहे. म्हणजेच त्यांनी हा फ्लॅट 1.63 लाख प्रति चौरस फूटाने खरेदी केला आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार चंद्रशेखरन त्यांची पत्नी ललिता आणि मुलगा प्रणव यांच्या नावावर खरेदी व्यवहार झाला आहे. विशेष म्हणजे टाटा ग्रुपचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन गेल्या पाच वर्षांपासून त्याच घरात भाड्याने राहात होते, ते या घरासाठी दर महिन्याला 20 लाखांचे भाडे देत होते. मात्र आता त्यांनी हा फ्लॅटच खरेदी केला आहे. पेडर रोडवरील 33 साऊथ नावाच्या अलिशान टॉवरमध्ये त्यांनी 11 वा आणि 12 वा मजला खरेदी केला आहे. 21 फेब्रुवारी 2017 साली एन चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सची जबाबदारी घेतली आणि त्यानंतर लगेचच ते या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आले होते. आता त्यांनी हे घर खरेदी केले आहे.
एन चंद्रशेखरन यांनी खरेदी केलेला हा फ्लॅट मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळच आहे. म्हणजेच आता एन चंद्रशेखरन हे मुकेश अंबानी यांचे शेजारी बनले आहेत. एन चंद्रशेखरन यांनी 21 फेब्रुवारी 2017 साली टाटा सन्सची जबाबदारी स्विकारली होती. टाटा सन्सची जबादारी स्विकारताच ते या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आले होते. भाड्यापोटी ते दर महिन्याला 20 लाख रुपये देत होते. मात्र त्यांनी आता हा फ्लॅट खरेदी केला आहे. 98 कोटी रुपयांना हा व्यवहार पार पडला. मुंबईमध्ये जे काही घर खरेदीचे व्यवहार होतात त्यातील हा एक महागडा व्यवहार असल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.
एन चंद्रशेखरन हे टाटा ग्रुपचे अध्यक्ष आहेत, त्यांनी 21 फेब्रुवारी 2017 साली टाटा सन्सची जबाबदारी स्विकारली होती. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार त्यांना टाटा ग्रुपच्या वतीने 91 कोटी रुपये पगार आणि इतर भत्तांचा लाभ देण्यात येतो. एन चंद्रशेखरन हे 20 फेब्रुवारी 2027 पर्यंत टाटा सन्सचे अध्यक्ष राहण्याची शक्यता आहे. या महागड्या व्यवहाराची मार्केटमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.