jamshedji tata: भारतातील श्रीमंत उद्योगपतींमध्ये मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा, अझीम प्रेमजी यांची नावे घेतली जातात. परंतु भारतातील सर्वाधिक दान देणाऱ्यांची यादी केल्यावर टाटा परिवाराचे नाव सर्वात वरती येते. भारतात आतापर्यंत सर्वाधिक दान दिलेल्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर टाटा ग्रुपचे फाउंडर जमशेदजी टाटा आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनकाळात 8.29 लाख कोटी रुपये दानमध्ये दिले आहे. ही रक्कम त्या काळातील आहे. आजच्या श्रीमंताच्या दानापेक्षा ती कितीतरी जास्त आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक कर्णच म्हणावे लागेल.
महाभारतातील कर्ण आपल्या दानामुळे ओळखला जातो. कर्णाने कधीच कोणाला रित्या हाताने पाठवले नाही. पण आजच्या आधुनिक भारताच्या इतिहासात सर्वाधिक दान देणाऱ्यांच्या यादीत जमशेदजी टाटा यांचे नाव सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. 2021 मधील एडेलगिव हूरून फिलंथ्रॉपी रिपोर्टनुसार, जमशेदजी टाटा यांनी शिक्षण, आरोग्य, सामजिक क्षेत्रात अनेक कामे केली आहेत. त्यामुळे देशांमध्ये अनेक संस्था उभ्या राहिल्या. त्याचा फायदा कोट्यवधी भारतीयांना झाला.
जमशेदजी टाटा यांनी 1868 मध्ये टाटा ग्रुपची स्थापना केली होती. आज टाटा इंडस्ट्रीजचा व्यवसाय 24 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. गुजरातमधील एका पारसी परिवारात जमशेदजी टाटा यांचा जन्म झाला. टाटा परिवाराची दान देण्याची संस्कृती राहिली आहे. जमशेदजी टाटा यांच्यानंतर त्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतनजी टाटा यांनी ही संस्कृती पुढे सुरु ठेवली. दोराबजी टाटा यांच्या निधनानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहाची सूत्र स्वीकारली.
रतनजी टाटा यांच्यानंतर त्यांचा मुलगा जेआरडी टाटा हे टाटा समूहाचे चेअरमन राहिले. तसेच रतनजी टाटा यांनी नवल टाटा यांना दत्तक घेतले. नवल टाटा यांनी दोन लग्न केले. एकापासून रतन टाटा आणि जिम्मी टाटा ही मुले झाली. त्यांच्या दुसऱ्या पत्नीकडून नोएल टाटा यांचा जन्म झाला. ते रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. तेच आता टाटा ग्रुपचे चेअरमन झाले.