टाटा समुहाकडून लवकरच UPI अ‍ॅप लाँच; Google Pay आणि Phone Pe ला देणार जोरदार टक्कर

| Updated on: Mar 19, 2022 | 9:28 PM

Tata Niue हे सुपर अ‍ॅप एप्रिल महिन्यात लॉन्च झाले आहे. UPI अ‍ॅप देखील याच्या आसपास सुरू करता येईल. UPI ज्या गतीने वाढत आहे ते लक्षात घेऊन अनेक कंपन्या या क्षेत्रात उडी घेऊ इच्छितात. यामध्ये टाटा समूहाचा समावेश आहे.

टाटा समुहाकडून लवकरच UPI अ‍ॅप लाँच; Google Pay आणि Phone Pe ला देणार जोरदार टक्कर
TATA UPI App
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्लीः मोबाईल तंत्रज्ञानात (Mobile Tecnology) दिवसेंदिवस अनेक बदल होत आहेत, या बदलाबरोबर अनेक नवनवीन अ‍ॅप्स लाँच होत आहेत. आता टाटा समूहही (Tata Group) लवकरच आपले UPI अ‍ॅप (App) लॉन्च करण्याची तयारी करत आहे. फोन पे आणि गुगल पे या अ‍ॅपप्रमाणेच आता टाटा ग्रुपचा UPI देखील मोबाईलवरून यूजर्सना सहज वापरता येणार आहे. या UPIसाठी टाटा समूहाने तयारीही जोरदार केली असून त्याची आता अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.

जोरदार टक्कर देणार

टाटाकडून निर्मित करण्यात आलेले UPI अ‍ॅप फोन पे, गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे आणि पेटीएमला जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे. टाटांकडून याबाबतची माहिती अनेक माध्यमांतून देण्यात आली आहे. टाटा समूह नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा NPCI कडून मंजुरीची वाट पाहत आहे. या अ‍ॅपला NPCI कडून मंजुरी मिळण्यानंतर टाटा समूह तृतीय पक्ष पेमेंट सेवा म्हणून UPI ​​ची सेवा सुरु करण्यात येणार आहे. याबाबत Economic Times ने माहिती दिली आहे.

पायाभूत सुविधा बाजारात

टाटा डिजिटलकडून UPI अ‍ॅप लाँच करण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, UPI अ‍ॅप चालवण्यासाठी टाटा डिजिटल हे आयसीआयसीआय बँक आणि इतर खासगी बँकांच्या संपर्कात आहे. या बँकांच्या साहाय्याने टाटा समूह UPI पायाभूत सुविधा बाजारात आणणार आहे.

टाटा समूहाचा आणखी एक मोठा धमाका

टाटा समूह आता विविध क्षेत्रात आपला प्रभाव वाढवत असतानाच आता टाटा समूह आणखी एका मोठ्या उपक्रमासाठी काम करत आहे. Tata Niue हे अ‍ॅप 1 एप्रिल रोजी लॉन्च करणार आहे. या अ‍ॅपला सुपर अ‍ॅप असेही नाव देण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून टाटा समूह उशिरा का होईना, पण आता ई-कॉमर्स क्षेत्रात मोठी क्रांती करण्याच्या तयारीत आहे.

टाटा ग्रुपचे सुपर अ‍ॅप

Tata Niue या अ‍ॅपनतर UPI अॅप देखील यूजर्ससाठी आणले जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना पेमेंट करणे तसेच वस्तू खरेदी करणे सोपे जाणार आहे. टाटा ग्रुपचे सुपर अ‍ॅप न्यू हे अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट तसेच स्विगी आणि ब्लिंकिटसह अनेक मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे.

सर्वांच्या नजरा UPI पेमेंटवर

टाटा समुहाकडून Tata Niue हे सुपर अ‍ॅप एप्रिल महिन्यात लाँच केले जाणार आहे. UPI अ‍ॅप देखील या दरम्यानच सरु करण्याच्या तयारीत आहेत. UPI ज्या गतीने वाढत आहे ते लक्षात घेऊन अनेक कंपन्या या क्षेत्रात येण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातच, UPI द्वारे 4.5 अब्जाचे व्यवहार झाल्याचे सांगण्यात येत आहे. व्यवहारासाठी नोटा छापणे, एटीएम यासारख्या गोष्टींवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी सरकार डिजिटल पेमेंटवरही भर देत आहे. सध्या देशात NPCI अंतर्गत २३ थर्ड पार्टी अॅप्सची नोंदणी झाली आहेत. देशामधील NPCI चे 10 बँकांबरोबर करार असून त्या अंतर्गत UPI सुविधा दिली जाते.

संबंधित बातम्या

‘फेडरल रिझर्व्ह’च्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाकडे लक्ष; पुढील महिन्यात होणार महत्त्वाची बैठक

रशिया युक्रेन युद्ध: तेल आयातीसाठी ‘या’ देशाकडून भारताला आणखी एक ऑफर; वाढत्या किंमतीवर होईल परिणाम

सावधान! Income Tax वाचवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब कराल तर पकडले जाल; आयकर अधिकारी ‘असा’ घेणार शोध