नवी दिल्ली : टाटा-मिस्त्री वाद पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात सुरू असलेल्या वादात नवा ट्विस्ट समोर आलाय. शापूरजी पालनजी (एसपी) समूहाचे प्रवर्तक गुंतवणूकदारांना डिबेंचर विकून 6,600 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत असल्याचे वृत्त आहे. यासाठी टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचे शेअर्स गहाण ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भात मिस्त्री कुटुंबीयांच्या कंपनीने 25 सप्टेंबर रोजी कंपनी रजिस्ट्रारकडे कागदपत्रे सादर केलीत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा सन्सने मिस्त्रींच्या अशाच हालचालींवर आधीच आक्षेप घेतल्याने कायदेशीर तज्ज्ञ हे पाऊल “संभाव्य वादग्रस्त” मानत आहेत. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये मिस्त्री कुटुंबाचा 18 टक्के हिस्सा आहे. सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर 2016 मध्ये टाटा आणि मिस्त्री यांच्यात वाद सुरू झाला.
मिस्त्री कुटुंबाने स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्प रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, 6,600 कोटी रुपये प्रमोटर ग्रुप कंपनी इव्हेंजेलोस व्हेंचर्सच्या माध्यमातून उभारले जातील, यासाठी टाटा सन्सचे शेअर्स गहाण ठेवण्यात येतील. स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंटचे प्रवर्तक, ज्यात टाटा सन्समध्ये 9.185 टक्के हिस्सा आहे, टाटा सन्सचे समभाग समूहाची कंपनी इव्हेंजेलोस व्हेंचर्सद्वारे गहाण ठेवून 6,600 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत.
स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंटसह स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडे टाटा सन्सचे शेअर्स गहाण ठेवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. शापूरजी पालनजी अँड कंपनी लिमिटेडच्या 2,800 कोटी रुपयांच्या थकीत कर्जासाठी हे तारण ठेवण्यात आले होते. मात्र, कागदपत्रांनुसार कर्जाची परतफेड गेल्या महिन्यात वेळेवर झाली होती आणि बँकेने समभाग जारी केले होते. शापूरजी पालनजी अँड कंपनी आणि टाटा सन्सने त्यांना यासंदर्भात पाठवलेल्या कोणत्याही ईमेलला प्रतिसाद दिला नाही.
संबंधित बातम्या
Gold Silver Price Today : सोने झाले महाग, चांदीचे दरही वाढले; पटापट तपासा
भारताचे नवे सोने विनिमय कसे कार्य करेल? तुम्ही अशा प्रकारे ट्रेडिंग करू शकता