नवी दिल्ली : टाटा मोटर्सने बँक ऑफ इंडियासोबत रिटेल फायनान्स सामंजस्य करार केलाय. या कराराअंतर्गत कंपनीच्या सर्व प्रवासी वाहन ग्राहकांना वाहन वित्तपुरवठा सुविधेचा पर्याय असेल. या करारानुसार, बँक ऑफ इंडिया टाटा मोटर्सच्या ग्राहकांना 6.85 टक्क्यांपर्यंत कमी व्याजदराने वाहन कर्ज देईल. या सुविधेअंतर्गत वाहनाच्या मूल्याच्या जास्तीत जास्त 90 टक्क्यांपर्यंत वित्तपुरवठा सुविधा उपलब्ध असेल. यामध्ये एक्स-शोरूम किंमत तसेच विमा आणि नोंदणीचा खर्च समाविष्ट असेल. यासोबतच त्यावर ईएमआय सुविधाही मिळणार आहे. या अंतर्गत 7 वर्षांच्या कालावधीत 1502 रुपये प्रति लाख या दराने हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड केली जाऊ शकते.
यापूर्वी टाटा मोटर्सने लहान व्यावसायिक वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी इक्विटास एसएफबीसोबत असाच करार केला होता. ही ऑफर देशभरातील नवीन ICE कार, SUV आणि वैयक्तिक विभागातील इलेक्ट्रिक वाहनांवर लागू होईल. टाटा मोटर्सच्या कार खरेदीदारांना 31 मार्च 2022 पर्यंत या ऑफरमध्ये कोणतेही प्रोसेसिंग शुल्क भरावे लागणार नाही.
कंपनीने नुकतेच त्याचे निकाल सादर केले होते. त्यानुसार या तिमाहीत कंपनीला 4,415.5 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, तर गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटा 307.3 कोटी रुपये होता. त्याच वेळी, दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 61,378.8 कोटी रुपये होते, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 53,530 कोटी रुपये होते. सध्या, हा स्टॉक NSE वर रु. 13.40 (2.67%) च्या वाढीसह 515.40 च्या पातळीवर दिसत आहे.
देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) संख्या वाढत आहे. वाढत्या इंधनाच्या दरामुळे (Petrol Diesel Prise Hike) वाहनचाकलांकडूनही इलेक्ट्रिक वाहनांना पसंती मिळत असल्याचं दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारही इंधनावरचा भार कमी करून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. त्यासाठी विविध उपययोजनाही केल्या जात आहेत. आता केंद्र सरकारने त्यापुढे जात देशभरात ईलेक्ट्रिक वाहनांसाठीचे चार्जिंग पॉईंटस उभारण्याची योजना खाली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. देशातील सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्या HPC, BPCL आणि IOC देशात 22 हजार इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स स्थापन करतील. BPCL देशात 7000 ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. त्याचवेळी, HPCL 5000 आणि IOC एकूण 10,000 EV चार्जिंग स्टेशन उभारेल. अनेक रस्ते आणि मार्केटमध्ये चार्जिंग पॉइंट बसवण्याचे कामही सुरू झाले आहे. पेट्रोल पंपांनाही त्यांच्या कॅम्पसमध्ये ई-वाहन चार्जिंग सुविधा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
देशातील 400 शहरांमध्ये OLA 1 लाख इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सुरु करणार
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनशी संबंधित महत्त्वाचे नियम (EV) जारी, जाणून घ्या सर्वकाही