नवी दिल्ली : कोरोनाच्या या जीवघेण्या महामारीमध्ये (Coronavirus Crisis) आयकर विभागाने (Income Tax Department) वेळीवेळी करदात्यांना (Taxpayers) ई-मेलद्वारे सूचना केल्या. जेणेकरुन करदात्यांना प्रत्येक महत्त्वाचा मेसेज मिळावा. पण तरीदेखील अनेक करदाते मेले चेक करत नसल्यामुळे त्यांनी पुढे अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे आयकर विभागाने एक ट्वीट करून आम्ही पाठवलेल्या कोणत्याही ई-मेलकडे दुर्लक्ष करू नका असं करदात्यांना सूचित केलं आहे. (taxpayers if you got income tax department email do not ignore it)
आम्ही पाठवलेले प्रत्येक ई-मेल हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं असता तुम्हाला नुकसान होऊ शकतं असं आयकर विभागानं ट्वीटद्वारे म्हटलं आहे. अधिक माहितीनुसार, आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 40 लाखांहून अधिक करदात्यांना 1.36 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केल्याचं म्हटलं आहे.
Make sure that you don’t miss any emails coming from us.
If it’s from us, it’s important!#CheckReadRespond@nsitharamanoffc @Anurag_Office @FinMinIndia @PIB_India pic.twitter.com/ezgcCFlvJ1— Income Tax India (@IncomeTaxIndia) November 18, 2020
1.36 लाख कोटी परतावा जारी केला
यासंबंधी विभागाने एक ट्विट केलं आहे. आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 40 लाखांपेक्षा जास्त करदात्यांना 1.36 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. त्यामध्ये आतापर्यंत 35,750 कोटी रुपयांचा वैयक्तिक आयकर परतावा (IT Refund) दिला आहे. या कालावधीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कॉर्पोरेट कर परतावा केला गेल्याचं म्हटलं आहे.
CBDT issues refunds of over Rs. 1,36,066 crore to more than 40.19 lakh taxpayers between 1st April,2020 to 17th November,2020. Income tax refunds of Rs. 35,750 crore have been issued in 38,23,304 cases &corporate tax refunds of Rs.1,00,316 crore have been issued in 1,95,518 cases
— Income Tax India (@IncomeTaxIndia) November 18, 2020
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) 1 एप्रिल 2020 ते 17 नोव्हेंबर 2020 पर्यंत 40.19 लाख करदात्यांना 1,36,066 कोटींचा परतावा दिला आहे. यामध्ये 38,23,304 प्रकरणांमध्ये 35,750 कोटी रुपयांचा वैयक्तिक आयकर परतावा दिला गेला. इतकंच नाही तर 1,95,518 प्रकरणांमध्ये 1,00,316 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावाही देण्यात आला आहे. (taxpayers if you got income tax department email do not ignore it)
हे आहेत IT विभागाचे अधिकृत आयडी
दरम्यान, कोरोनाच्या संकट काळात फसवणूकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यामुळे अनेक लोक ई-मेल मिळाल्यानंतरही त्यावर उत्तर देत नाही आहेत. यासाठी आयकर विभागाकडून काही अधिकृत ई-मेलची यादी जारी करण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला खरंच आयकर विभागाचा मेल आला आहे की फसवणुकीचा आहे हे शोधणं सोपं जाईल. यासाठी आयकर विभागाने खालीलप्रमाणे अधिकृत ई-मेल आयडीची यादी जाहीर केली आहे.
– @incometax.gov.in
– @incometaxindiaefiling.gov.in
– @tdscpc.gov.in
– @cpc.gov.in
– @insight.gov.in
– @nsdl.co.in
– @utiitsl.com
या ई-मेल आयडीद्वारे जर तुम्हाला मेल आला तरच त्यावर उत्तर द्या असं आयकर विभागानं स्पष्ट केलं आहे. तर हा ई-मेल पाठवणाऱ्या विभागांचे सेंडर आयडी खालीलप्रमाणे दिले आहेत. (taxpayers if you got income tax department email do not ignore it)
– ITDEPT
– ITDEFL
– TDSCPC
– CMCPCI
– INSIGT
– SBICMP
– NSDLTN
– NSDLDP
– UTIPAN
संबंधित बातम्या –
Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस
SBI मध्ये खातं असेल तर लगेच चेक करा अकाऊंट, बँकेकडून ग्राहकांना ‘Alert’ जारी
(taxpayers if you got income tax department email do not ignore it)