नवी दिल्ली : जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारचा धोका नको असेल, तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल. पोस्ट ऑफिस योजनांमध्ये तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो. पोस्ट ऑफिस लहान बचत योजना अधिक चांगल्या आहेत. कमी खर्चात यामध्ये गुंतवणूक केल्यास मोठा पैसा मिळतो. अशाच एका पोस्ट ऑफिस योजनेचे नाव आहे, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट. यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो.
एकूणच या योजनेद्वारे तुम्ही खूप कमी पैशात गुंतवणूक सुरू करू शकता. या व्यतिरिक्त तुमचे पैसे देखील पूर्णपणे सुरक्षित असतील. यामध्ये तुम्ही दरमहा 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तुम्ही किती गुंतवणूक करू शकता, यावर कमाल मर्यादा नाही. पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट खाते हे लहान हप्ते चांगल्या व्याजासह जमा करण्याची सरकारी हमी योजना आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेले आरडी खाते 5 वर्षांसाठी असते. त्यापेक्षा कमी कालावधीसाठी ते उघडले जात नाही. प्रत्येक तिमाहीत (वार्षिक दराने) जमा केलेल्या रकमेवर व्याज मोजले जाते. त्यानंतर प्रत्येक तिमाहीच्या शेवटी ते तुमच्या खात्यात चक्रवाढ व्याजासह जोडले जाते. इंडिया पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, सध्या आरडी योजनेवर 5.8 टक्के व्याज दिले जात आहे. केंद्र सरकार आपल्या सर्व लहान बचत योजनांमध्ये दर तिमाहीत व्याजदर जाहीर करते.
जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी योजनेमध्ये दरमहा 10 हजार रुपये गुंतवलेत, तेही 10 वर्षांसाठी, तर त्याला मॅच्युरिटी झाल्यावर 16,26,476 लाख रुपये मिळतील.
जर तुम्ही आरडी हप्ता वेळेवर जमा केला नाही, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. हप्त्यात विलंब झाल्यास तुम्हाला दरमहा एक टक्के दंड भरावा लागेल. यासह जर तुम्ही सलग 4 हप्ते जमा केले नाहीत तर तुमचे खाते बंद होईल. जेव्हा खाते बंद होते, ते पुढील 2 महिन्यांसाठी पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते.
संबंधित बातम्या
PNB ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील महिन्यापासून मोठा बदल, ग्राहकांवर काय परिणाम?
तुम्हीसुद्धा LIC ची पॉलिसी घेतली असल्यास व्हा सावध, अन्यथा पैसे बुडणार, जाणून घ्या का?
The best savings plan brought by Post, will get 16 lakhs on savings of 10 thousand, know the benefit