नवी दिल्लीः जागतिक ग्राहक इंटरनेट समूह Prosus NV ने (PayU) भारतीय डिजिटल पेमेंट प्रदाता बिलडेस्कला सुमारे 34,376.2 कोटी रुपये (4.7 अब्ज डॉलर)मध्ये विकत घेतलेय. प्रोससने एका निवेदनात म्हटले आहे की, PayU आणि भारतीय डिजिटल पेमेंट प्रदाता BillDesk च्या भागधारकांनी बिलडेस्कला 4.7 अब्ज डॉलरमध्ये खरेदी करण्याचा करार केलाय.
प्रस्तावित अधिग्रहण प्रोसस पेमेंट्स आणि फिनटेक व्यवसाय PayU मध्ये जागतिक स्तरावरील आघाडीच्या ऑनलाईन पेमेंट प्रदात्यांपैकी एक म्हणून सामील होईल, असे निवेदनात म्हटले आहे. PayU ची 20 पेक्षा जास्त उच्च वाढीच्या बाजारपेठांमध्ये उपस्थिती आहे आणि एकूण पेमेंट व्हॉल्यूम (TPV) US 147 अब्ज डॉलरपेक्षा जास्त असेल.
निवेदनात म्हटले आहे की, या व्यवहारासाठी भारतीय स्पर्धा आयोगाची (CII) मान्यता घेणे आवश्यक आहे. BillDesk ची स्थापना 2000 मध्ये झाली. प्रोससचे ग्रुप सीईओ बॉब व्हॅन डिक यांनी सांगितले की, 2005 पासून भारतातील काही डायनॅमिक उद्योजक आणि नवीन तंत्रज्ञान व्यवसायांशी सहयोग आणि भागीदारीच्या रूपात देशाशी आमचे दीर्घ आणि सखोल संबंध आहेत. आम्ही आतापर्यंत भारतीय तंत्रज्ञानात सुमारे 6 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आणि या करारामुळे हा आकडा 10 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त होईल.
ते म्हणाले की, प्रोसस प्रामुख्याने अन्न पुरवठा आणि शिक्षण तंत्रज्ञान तसेच रक्कम आणि फिनटेक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करीत आहे आणि भारत आमचे गुंतवणुकीचे प्रमुख स्थान आहे. बिलडेस्कचे सह-संस्थापक एम. एन. श्रीनिवासू म्हणाले, प्रोससने केलेली ही गुंतवणूक भारतातील डिजिटल पेमेंटसाठी महत्त्वाची संधी म्हणून ओळखली जाते, नवकल्पना आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेल्या प्रगतिशील नियामक चौकटीद्वारे चालते.
देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआय पेमेंट एग्रीगेटर्सना परवाना देत आहे. हे परवाने RBI च्या आगामी गैर-बँक पेमेंट प्रदाते नियामक प्रणाली अंतर्गत दिले जात आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा ग्रुपसह अनेक कंपन्यांनी या परवान्यासाठी अर्ज केलेत. पेमेंट एग्रीगेटर परवान्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. विद्यमान आणि बँक नसलेल्या कंपन्या या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. अशा परिस्थितीत शेवटच्या तारखेच्या अखेरीस अर्ज करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढू शकते.
संबंधित बातम्या
मोठी बातमी! सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बरोबरीने LIC मध्ये FDI मर्यादा निश्चित करणार
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू
The company will buy Indian payment gateway firm BillDesk for Rs 34,376.2 crore