नवी दिल्ली | 31 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजाराने गेल्या पंधरवाड्यात गुंतवणूकदारांना जोरदार झटका दिला. त्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक क्षेत्रातील कंपन्यांना जोरदार फटका बसला. जागतिक घडामोडींचा थेट परिणाम शेअर बाजारात दिसून आला. बाजारात काही स्टॉकने अशा ही स्थितीत चमकदार कामगिरी बजावली. सध्या इलेक्ट्रिकल वाहनांना सुगीचे दिवस आले आहेत. कंपन्या जोरदार कामगिरी करत आहेत. तर केंद्र सरकारने पण सवलत दिली आहे. त्याचा फायदा या ईव्ही शेअरला पण झाला आहे. या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना 3,300 टक्के परतावा दिला आहे. भविष्यात अशीच घौडदौड कायम राहिल्यास हा शेअर गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरेल.
कंपनीची कामगिरी जोरदार
सर्वोटेक पॉवर सिस्टम्स (Servotech Power Systems) ही ईव्ही चार्जिंग आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीचा तिमाही निकाल गेल्या महिन्यात घोषीत झाला. कंपनीच्या महसूलात 114 टक्क्यांची वाढ झाली. महसूल दुसऱ्या तिमाहीत 85.93 कोटींवर पोहचला. कंपनीचा EBITDA हा 148 टक्क्यांनी वधारुन 5.97 कोटींवर पोहचला. तर या सहामहीत कंपनीचा महसूल 165.5 कोटी रुपयांवर पोहचला.
कंपनीकडे दोन पेटंट
सर्वोटेक पॉवर सिस्टम्सने या काळात दोन पेटंट मिळवले आहे. लोड शिफ्टिंगविषयी त्यांनी पहिले पेटंट मिळवले आहे. बॅटरी ऊर्जेसंबंधीच्या या संशोधनाचा कंपनीला मोठा फायदा झाला. तर दुसरे संशोधन अक्षय ऊर्जेसंबंधीचे आहे. या दोन पेटंटमुळे कंपनीला फायदा झाला आहे. कंपनीची सौरऊर्जा आणि ईलेक्ट्रिक वाहनासंबंधीच्या प्रकल्पांना बळ मिळाले आहे.
शेअरने दिला मोठा परतावा
मंगळवारी या कंपनीच्या शेअरमध्ये 3.57 टक्क्यांची वाढ झाली. हा शेअर 79.8 टक्क्यांवर होता. तर इंट्राडेमध्ये हा स्टॉक 79.95 रुपयांवर पोहचाल. या कंपनीचे मार्केट कॅप 1700 कोटी रुपयांहून अधिक आहे. या स्टॉकने मल्टिबॅगर रिटर्न दिले आहेत. गेल्या सहा महिन्यात या कंपनीने 203 टक्के परतावा तर एका वर्षात 400 टक्के परतावा दिला. तर तीन वर्षात या शेअरने 3,370 टक्क्यांचा परतावा दिला. त्यामुळे लवकरच हा स्टॉक मोठी कमाल करण्याची शक्यता आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.