इथे घेणार अनंत अंबानी आणि राधिका 7 फेरे, गुजरातला मिळणार 14 नवीन मंदिरं

| Updated on: Feb 27, 2024 | 8:29 PM

Anant Ambani and Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा ही बघायला मिळतंय. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा हा गुजरातमध्ये पार पडतोय. जामनगर येथे या विवाहसोहळ्याची जोरदार तयारी ही सुरू आहे.

इथे घेणार अनंत अंबानी आणि राधिका 7 फेरे, गुजरातला मिळणार 14 नवीन मंदिरं
Follow us on

मुंबई : मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. अनंत अंबानी हा आपली बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंट हिच्यासोबत लग्न करतोय. 2023 मध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा हा पार पडला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न गुजरातमधील जामनगर येथे पार पडतंय. विशेष म्हणजे या लग्नासाठी विदेशातून खास पाहुणे देखील दाखल होत आहेत. 2024 च्या शाही विवाहसोहळ्यांपैकी हे एक लग्न असणार आहे. या शाही विवाहसोहळ्यास 1000 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. 2500 पदार्थ या लग्न सोहळ्यात वाढली जाणार आहेत.

फक्त शाही विवाहसोहळाच नाही तर दुसरीकडे, अंबानी कुटुंबाने गुजरातमधील जामनगरमध्ये 14 नवीन मंदिरे बांधली आहेत. अंबानी कुटुंबाकडून ही 14 मंदिरे जामनगरच्या मोतीखावडीमध्ये बनवली गेली आहेत. विशेष म्हणजे ही मंदिरे अत्यंत खास आहेत. याबाबतची एक पोस्ट ही रिलायन्स फाऊंडेशनकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीये.

पोस्टनुसार, या मंदिरांमध्ये नशिदार काम, फ्रेस्को शैलीतील पेंटिंग्ज, देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. देशाचा प्राचीन इतिहास आणि परंपरा एकत्र आणण्याचा आणि जतन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पोस्टमध्ये सांगण्यात आलंय. हेच नाही तर मंदिराच्या कामासाठी रिलायन्स ग्रुपने देशातील विविध ठिकाणांहून कारगिरांना आणले.

एकून 14 मंदिरे तयार करण्यात आली आहेत. या विवाहसोहळ्याची जवळपास तयारी ही पूर्ण झाल्याचे कळतंय. बाॅलिवूडचे अनेक कलाकारही या विवाहसोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. अमिताभ बच्चन, रजनीकांत आणि सलमान खान यांना या विवाहसोहळ्याचे निमंत्रण असल्याचे सांगितले जाते. विदेशातूनही मान्यवर या विवाहसोहळ्यास उपस्थित राहतील.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा जामनगरमध्ये 1 ते 3 मार्चला आहे. मेटा संस्थापक मार्क झुकरबर्ग देखील या विवाहसोहळ्यास हजेरी लावतील असे सांगितले जात आहे. या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे बघायला मिळतंय. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा देखील अत्यंत खास पद्धतीने पार पडला होता.