मुंबई: सध्या शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी विक्रमी टप्प्याला गवसणी घातली आहे. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. आगामी काही महिन्यांमध्ये मुंबई बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स एक लाखांचा टप्पा ओलांडेल, असे भाकीत वर्तविले जात आहे. अशावेळी आतापासूनच गुंतवणूक करुन चांगला फायदा पदरात पाडून घेण्याची संधी आहे.
गेल्या काही दिवसांत अगदी कवडीमोल भावात मिळणाऱ्या penny stock ने गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. अशा समभागांची किंमत साधारण 25 रुपयांच्या आसपास असते. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना हे समभाग खरेदी करणे शक्य असते. सध्याच्या घडीला शेअर मार्केटमध्ये असे अनेक पेनी स्टॉक आहेत. भविष्यात हे पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना चांगली कमाई करुन देऊ शकतात.
या समभागाने ऑक्टोबर 2020 पासून ₹1.24 रुपयांवरुन ₹114 रुपयांवर उडी घेतली आहे. एका वर्षात या समभागाने गुंतवणूकदारांना 9100 टक्के रिटर्न्स दिले आहेत. फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स ही कंपनी समुद्री वाहतूक करते.
हा स्टॉक ऑक्टोबर 2020 मध्ये सुमारे 48 1.48 रुपयांवरून सध्या ₹ 71 च्या आसपास वाढला आहे, ज्यामुळे त्याच्या गुंतवणूकदारांना फक्त 1 वर्षात 4,717 टक्के परतावा मिळाला आहे. आदिनाथ टेक्सटाइल्स लिमिटेड भारतात मिश्रित अॅक्रेलिक आणि धाग्यांची निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय करते.
हा स्टॉक ऑक्टोबर 2020 मध्ये सुमारे 3 रुपयांपासून सध्या ₹ 40 च्या आसपास वाढला आहे. ज्यामुळे त्याच्या गुंतवणूकदारांना फक्त 1 वर्षात 1,223 टक्के परतावा मिळतो. टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड मूलभूत आणि सेल्युलर दूरसंचार सेवा पुरवते. कंपनी वायर्ड आणि वायरलेस दूरसंचार क्षेत्रात आहे.
गेल्या सहा महिन्यांत Rattanindia Enterprises च्या शेअर्सनी गुंतवणूकादारांना नऊपट परतावा दिला आहे. या काळात कंपनीने गुंतवणूकदारांना 800 टक्के फायदा करुन दिला आहे. 30 एप्रिलला Rattanindia च्या समभागाची किंमत 4.95 रुपये इतकी होती. मात्र, 4 ऑक्टोबरला या समभागाने 44.60 रुपयांची पातळी गाठली होती. याचा अर्थ एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्याचे मूल्य 9 लाख रुपये इतके झाले आहे. Rattanindia चे भांडवली बाजारातील एकूण मूल्य 6,164.92 कोटी इतके झाले आहे. Rattanindia Enterprises कंपनीचा पसारा औष्णिक उर्जा, रिन्यूएबल एनर्जी, ग्राहक वित्तपुरवठा अशा विविध क्षेत्रांमध्ये पसरला आहे. या क्षेत्रातील अन्य कंपन्यांच्या तुलनेत Rattanindia ची भांडवली बाजारातील कामगिरी खूपच उजवी आहे.
संबंधित बातम्या:
अवघ्या 24 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 2064 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा
अवघ्या 1.55 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 301.60 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा
अवघ्या सात रुपयांत मिळणाऱ्या शेअरची किंमत झाली 718 रुपये, एका लाखाचे झाले 1 कोटी