Marathi News Business This bank has changed the interest rate of Fixed Deposit, now what is the benefit on FD?
‘या’ बँकेने Fixed Deposit चे व्याजदर बदलले, आता FD वर किती फायदा?
या बँकेतही तुम्ही 10,000 रुपयांसह FD मध्ये गुंतवणूक करू शकता. बँक 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत FD सुविधा देते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार गुंतवणूक करू शकता. येथे आम्ही तुम्हाला नवीन व्याज दराबद्दल सांगत आहोत.
1 / 6
Yes Bank interest rates Changed on Fixed Deposit: येस बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या खासगी बँकेने अलीकडेच FD वर उपलब्ध व्याजदर अर्थात मुदत ठेव (FD) मध्ये बदल केलाय. बँकेने बदललेले व्याजदर 5 ऑगस्टपासून लागू झालेत. या बँकेतही तुम्ही 10,000 रुपयांसह FD मध्ये गुंतवणूक करू शकता. बँक 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत FD सुविधा देते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार गुंतवणूक करू शकता. येथे आम्ही तुम्हाला नवीन व्याज दराबद्दल सांगत आहोत.
2 / 6
जर तुम्ही येस बँकेत 7 ते 14 दिवसांची मुदत ठेव केली तर बँक तुम्हाला 3.25 टक्के दराने व्याज देईल. त्याचबरोबर 15 ते 45 दिवसांसाठी बँक 3.50 टक्के व्याज देईल आणि 46 ते 90 दिवसांसाठी बँक 4 टक्के दराने व्याज देईल.
3 / 6
FD मुदत कालावधी : तुम्ही तुमच्या गरजेनुसार FD मिळवू शकता. जर तुमच्याकडे आता गरजेपेक्षा जास्त पैसे असतील आणि तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला 5 किंवा 10 वर्षांनंतर या पैशांची गरज असेल, तर तुम्ही इतक्या कालावधीसाठी FD करु शकता. अर्थात, 10 वर्षांच्या एफडीवरील परतावा एका वर्षाच्या तुलनेत खूप जास्त असेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार शक्य तितक्या कालावधी FD मिळवू शकता.
4 / 6
Pension fund
5 / 6
दीड ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी तुम्हाला 6 टक्के, तर 3 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी तुम्हाला 6.25 टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला 5 ते 10 वर्षांच्या दरम्यान FD वर 6.50 टक्के व्याज मिळेल.
6 / 6
ज्या पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदराची सुविधा दिली जात होती, ती पुढेही सुरू राहील, असे बँकेने स्पष्ट केले. 0.50 टक्क्यांपासून ते 0.75 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त व्याज बँकांनी ज्येष्ठ नागरिकांना दिले. येस बँकेत ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.75 ते 7.25 टक्के व्याजदर दिला जातो.