अनेक वेळा शॉपिंग करण्यासाठी तुम्ही शॉपिंग मॉल मध्ये गेले असाल. कधी मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी तर कधी शॉपिंग करण्यासाठी गेला असाल. मॉल मध्ये गेल्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का की मॉलमध्ये एकही खिडकी नसते. सामान्यतः इमारतीमध्ये खिडक्या असतात. ज्यामुळे बाहेरचे दृश्य दिसते आणि हवा खेळती राहते. घरामध्येही खिडक्या असतात ज्यामुळे घरामध्ये हवा खेळती राहते. पण शॉपिंग मॉल मध्ये खिडकी नसते याचं काय कारण आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घेऊया या मागचे कारण.
सर्वप्रथम जेव्हा अमेरिकेमध्ये मॉलचा ट्रेंड सुरू झाला तेव्हा खिडकी नसलेले मॉल तयार करण्याकडे कल वाढला गेला. यामागे एक विशेष हेतू होता. मॉल ची रचना याप्रकारे केल्या गेली की ज्यामुळे बाहेरचे काहीही दिसणार नाही आणि वेळ कळणार नाही. मॉलमध्ये असलेले लाईट आणि वस्तूंचा लखलखाट एवढा असतो की संध्याकाळ असली तरी देखील दिवस आहे असे आपल्याला भासते. यामुळे लोक मॉलमध्ये जास्त वेळ घालवतात आणि मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.
वेळ न समजणे
मॉलमध्ये खिडक्या नसल्यामुळे नैसर्गिक प्रकाशक येत नाही आणि बाहेरचे काहीही दिसत नाही. त्यामुळे मॉलमध्ये असलेल्या लोकांना किती वेळ झाला आहे हे समजत नाही. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.
लक्ष विचलित होणे
खिडकी असल्यामुळे खरेदी करणाऱ्यांचे लक्ष बाहेर जाते आणि त्यांचे खरेदीकडे दुर्लक्ष होते. यामुळे मॉलमध्ये खिडक्या नसतात ज्यामुळे लोक खरेदीवर लक्ष केंद्रित करतात आणि अधिक खरेदी करतात.
मॉलचा आकार लपवणे
खिडक्या नसल्याकारणाने मॉलचा खरा आकार समजत नाही. त्यामुळे ग्राहकांना असे वाटते की आणखीन बराच मॉल शिल्लक आहे. ग्राहक सगळा मॉल फिरतात आणि जास्त खरेदी करतात.
तापमान नियंत्रित करणे
मॉलला खिडक्या नसल्यामुळे मॉल चे तापमान, प्रकाश आणि आवाज सहज नियंत्रित करता येतो. यामुळे ग्राहकांना मॉलमध्ये आरामदायक आणि आकर्षक वाटते.
जागा उपलब्ध होते
खिडक्या नसल्यामुळे भिंतीवरील अधिक जागा वापरणे सहज शक्य होते. यामुळे मॉलमध्ये जास्त दुकाने आणि प्रदर्शन स्टॉल उभारता येतात.
सुरक्षेच्या कारणासाठी
खिडकी मधून चोरांना सहज येणे शक्य होते. मॉलमध्ये खिडक्या नसल्यामुळे चोरीच्या घटना टाळता येतात आणि ग्राहकांना सुरक्षा पुरवण्यात येते.