नवी दिल्ली | 23 जुलै 2023 : भारतीय शेअर बाजार (Share Market) गेल्या काही दिवसांपासून नवनवीन रेकॉर्ड तयार करत आहे. गेल्या 3 आठवड्यात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीने कित्येकदा सर्वकालीन उच्चांक गाठला. गेल्या आठवड्यात तर निफ्टी (Nifty) 20 हजार अंकाच्या जवळपास पोहचला होता. बीएसईने (BSE) पण नवीन रेकॉर्ड केला. दोन्ही निर्देशाकांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. बाजाराच्या या भरारीने कमाईची संधी मिळाली. काही शेअर्स सातत्याने मल्टिबॅगर ठरत आहेत. तर काही कंपन्यांचे तिमाही निकाल सुरु झाले आहेत. त्यासोबत लाभांश (Dividend) आणि बोनस (Bonus) पण देण्यात येत आहे. सोमवारपासून अजून काही कंपन्यांचे निकाल समोर येतील. त्यामुळे गुंतवणूकदारांची कमाई होईल. त्यांना मोफत नवीन शेअर मिळतील.
100 हून अधिक शेअरचा एक्स-डिव्हिडेंड
24 जुलैपासून पुढील आठवड्यात 100 हून अधिक शेअर एक्स-डिव्हिडेंड देणार आहेत. तर दुसरीकडे काही शेअर एक्स-बोनस शेअर देत आहेत. BSE च्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, यावर्षी जवळपास 35 कंपन्या शेअरधारकांना बोनस शेअर देणार आहेत. येत्या आठवड्यात यातील 4 कंपन्या एक्स बोनस शेअर देणार आहेत.
काय आहे बोनस शेअर
अनेक कंपन्या त्यांच्या शेअरधारकांना शेअरचे गिफ्ट देणार आहेत. बोनस शेअरसाठी कोणतीहा खर्च करावा लागणार आहे. उदाहरणानुसार, 1:1 प्रमाणात बोनस शेअरची घोषणा केली तर गुंतवणूकदारांना जुन्या शेअरवर एक नवीन शेअर देण्यात येईल. त्यालाच एक्स-बोनस डेट म्हणतात.
एनडीआर ऑटो कम्पोनेंट्स (NDR Auto Components)
वाहनांचे स्पेअर पार्ट तयार करणारी ही कंपनी शेअरधारकांना एका शेअरच्या बदल्यात एक नवीन शेअर देणार आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी, 24 जुलै रोजी सोमवारी एक्स-बोनस देणार आहे.
व्हीआर फिल्मस (V R Films)
व्हीआर फिल्मस 26 जुलै रोजी एक्स-बोनस शेअर देणार आहे. या कंपनीने 7:1 या प्रमाणात शेअरची घोषणा केली आहे. 7 जुन्या शेअरवर एक नवीन शेअर देण्यात येईल.
मान एल्युमिनीयम (Maan Aluminum)
मान एल्युमिनीयमचा एक्स-बोनस शेअर 27 जुलै रोजी देण्यात येईल. कंपनीने 1:1 प्रमाणात बोनस इक्विटी शेअर देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
रेमेडियम लाइफकेअर (Remedium Lifecare)
रेमेडियम लाइफकेअर 29 जुलै रोजी एक्स बोनस शेअरचे वाटप करणार आहे. ही कंपनी 9:5 प्रमाणात बोनस शेअर मिळेल. म्हणजे शेअरधारकांना प्रत्येक 9 जुन्या शेअरवर 5 नवीन शेअर मिळतील.
(विशेष सूचना : ही शेअर आणि त्यांच्यासंबंधीची माहिती आहे. बाजारातील गुंतवणूक बाजारातील जोखिमेअधीन आहे. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. TV9 मराठी कोणालाही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)