मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावांमध्ये घसरण होत असल्याचं दिसून आलं. आजही राज्यात सोन्याच्या किंमती घसरल्याचं पहायला मिळालं. आज जळगावमध्ये सोन्याचा भाव 48 हजार 200 प्रतितोळा आहे तर अवघ्या 9 दिवसांमध्ये सोन्याचे भाव कमीच झाल्याचं समोर आलं आहे. कारण, जानेवारीच्या शेवटच्या तारखेला म्हणजे 31 जानेवारीला सोन्याचा भाव 50 हजार 703 प्रतितोळा होता. (today gold price 9 february gold rate in mumbai pune maharashtra here is latest price)
आज मुंबईतही सोन्याचे भाव घसरले आहेत. मुंबईत 31 जानेवारीला 46 हजार 744 रुपये प्रतितोळा सोन्याची किंमत होती तर आज मात्र सोन्याच्या किंमती घसरून 45 हजार 21 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचल्या आहेत. आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावामध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा वायदा भाव किंमत 0.13 टक्क्यांनी घसरला होती. ही 6 सत्रात पाचवी घसरण असल्याची माहिती देण्यात आली. इतकंच नाहीतर चांदीच्या किंमतीतही 0.2 टक्क्यांची घसरण झाली होती. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
सोने-चांदीचे कालचे दर (Gold and Silver Rates on 8 February 2021)
सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर फेब्रुवारीमधील सोन्याचा वायदा भाव 0.13 टक्क्यांनी घसरून 47,195 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता तर एक किलो चांदीची किंमत 0.28 टक्क्यांनी घसरून 68,593 रुपये झाली.
इतर शहरांमधील भाव
जळगाव
31 जानेवारी : 50 हजार 703 प्रतितोळा
9 फेब्रुवारी : 48 हजार 200 प्रतितोळा
मुंबई
31 जानेवारी- 46 हजार 744 रुपये प्रतितोळा
आज – 45 हजार 21 रुपये प्रती तोळा
पुणे
31 जानेवारी : 49 हजार 600 प्रतितोळा
9 फेब्रुवारी : 48 हजार 900 प्रतितोळा
औरंगाबाद
31 जानेवारी : 48 हजार 980 प्रतितोळा
9 फेब्रुवारी : 47 हजार 512 प्रतितोळा
कोल्हापूर
31 जानेवारी : 50 हजार 700 प्रतितोळा
9 फेब्रुवारी : 48 हजार 900 प्रतितोळा
नागपूर
31 जानेवारी : 49 हजार 100 प्रतितोळा
9 फेब्रुवारी : 49 हजार 50 प्रति तोळा
नाशिक
31 जानेवारी : 50,500 प्रतितोळा
9 फेब्रुवारी : 48,800 प्रतितोळा
सोलापूर
31 जानेवारी : 49 हजार 760 रुपये प्रतितोळा
9 फेब्रुवारी : 48 हजार 360 रुपये प्रतितोळा
रत्नागिरी
31 जानेवारी : 49 हजार 770 प्रतितोळा
9 फेब्रुवारी : 48 हजार 760 प्रतितोळा
…म्हणून सोने स्वस्त होऊ लागले
2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव दिला. सध्या ते 12.5 टक्के आहे. यापूर्वी जुलै 2019 मध्ये शुल्कात 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे दर झपाट्याने वाढले होते.
सोनं स्वस्त का होतंय?
आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकन डॉलरची किंमत वाढत चालली आहे. म्हणूनच सोन्याचे दर सतत घसरत आहेत. परदेशी बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 1800 डॉलरवर आली आहे. नोव्हेंबर 2020 नंतर हे घडले आहे. चांदीच्या किमतींमध्ये अजूनही चढउतार कायम आहे. यामागील औद्योगिक मागणीत तेजी आहे. कमोडिटी मार्केटमधील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर जगातील आर्थिक घडामोडी अशाच प्रकारे चालू राहिल्या, तर येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत आणखी घसरण येऊ शकते.
सोने आणखी स्वस्त होऊ शकते
शुक्रवारी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत रिझर्व्ह बँकेने असे सूचित केले आहे की, बँकांना सीआरआर पातळी आधीच्या कोरोना व्हायरसपर्यंत घ्यावी लागेल. त्यानंतर व्याजदरात वाढ होण्याची चिन्हे देखील आहेत, यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव वाढणार आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, सोन्याच्या किमती सध्याच्या पातळीवरून 4600 रुपयांवरून प्रति दहा ग्रॅमपर्यंत घसरून 42000 रुपयांवर येऊ शकतात.
सोन्याचे दागिने खरेदी करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
बर्याचदा आपण असे दागिने खरेदी करतो ज्यात खडे असतात. काही ज्वेलर्स संपूर्ण खड्यांचे वजन करतात आणि सोन्याच्या किमतीसह एकत्र करतात. म्हणजेच सोन्याच्या किमतीइतकेच त्यांची किंमत आहे. सोने मोडताना किंवा परत विकताना खड्यांचे वजन आणि अशुद्धता सोन्याचं एकूण मूल्य वजा केले जाते.
सोन्याचे दागिने वेगवेगळ्या कॅरेटमध्ये येतात. कॅरेट सोन्याच्या शुद्धतेचे मापन आहे. सर्वात शुद्ध सोने हे 24 कॅरेटचे आहे. दागिने सहसा 22 कॅरेटमध्ये बनवतात. यात 91.6 टक्के सोने असते. मेकिंग चार्ज हा आपल्या डिझाईनचे दागिने खरेदी करण्यावर अवलंबून असतो. यामागील मुख्य कारण म्हणजे प्रत्येक दागदागिने कटिंग आणि फिनिशिंगसाठी वेगवेगळी शैली वापरतात. बीआयएस मानक हॉलमार्क सोन्याचे दागिने प्रमाणित करण्यासाठी हॉलमार्किंग केले जाते. हे भारतीय मानक ब्यूरोने (बीआयएस) केले आहे. दागदागिने खरेदी करताना हे पाहिलेच पाहिजे. (today gold price 9 february gold rate in mumbai pune maharashtra here is latest price)
संबंधित बातम्या –
‘या’ बड्या बँकेत 1 मार्चपासून होणार आहे मोठा बदल, नाही करता येणार पैसे ट्रान्सफर
LPG नंतर आता CNG आणि PNG गॅसही महागला, इथे वाचा ताजे दर
Petrol Diesel Price Today: दिल्लीत पेट्रोल 87 रुपये पार; डिझेल खूप महाग; मुंबईत भाव काय?
तुमच्याही गाडीला मिळेल सनरूफ फीचर, स्वस्तात आहे खास ऑफर
(today gold price 9 february gold rate in mumbai pune maharashtra here is latest price)