देशातील पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे नवे दर (Today petrol diesel rate) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, आज सलग 20 व्या दिवशी पेट्रोल (petrol), डिझेलचे (diesel) दर स्थिर आहेत. इंधनाच्या दरात शेवटची दरवाढ सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती. दरम्यान याबाबत बोलताना पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की, भारत हा जगातील तीसऱ्या नंबरचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. कच्च्या तेलाच्या किमती सतत बदलत आहेत. मात्र तरी देखील आपण देशात इंधनाच्या किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. देशभरात दर दिवशी सहा कोटीपेक्षा अधिक लोक पेट्रोल, डिझेल खरेदी करतात. केंद्राने यापूर्वीच एक्साईज ड्युटी कमी केली आहे, आता पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त हवे असल्यास राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी करावा. गेल्या वर्षी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केल्याने पेट्रोल प्रति लिटर पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते.
पेट्रोलियम कंपन्यांकडून दर दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर करण्यात येतात. नव्या दरानुसार इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर असल्याने सलग 20 व्या दिवशी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर तर डिझेल 100.94 रुपये लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल, डिझेलचे भाव अनुक्रमे 115.12 आणि 99.83 रुपये प्रति लिटर आहे.
पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जाहीर करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राज्यात देखील इंधनाचे दर स्थिर आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 120.20 आणि 103.10 रुपये प्रति लिटर आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.40 इतका असून, डिझेल 103.73 रुपये लिटर आहे. परभणीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 123.51 तर डिझेलचा दर प्रति लिटर 106.10 रुपये लिटर आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 121.13 रुपये असून डिझेलसाठी 103.79 रुपये मोजावे लागत आहेत.
Stock Market : शेअर बाजारात पैसे न गुंतवताही मिळवा उत्पन्न, जाणून घ्या पैसे कसे मिळवाल?
SHARE MARKET: शेअर बाजारात विक्रीचा दबाव, गुंतवणुकदारांत अस्थिरता; जाणून घ्या- मार्केटचा मूड