मुंबई : अर्थसंकल्पानंतर दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात (SHARE MARKET UPDATE) तेजीचं सत्र दिसून आलं. आज (बुधवारी) सेन्सेंक्स 695 अंकांच्या वाढीसह 59,558 वर पोहोचला. तर निफ्टीत 203 अंकांच्या वाढीसह 17,780 अंकांवर बंद झाला. बजाज फिनसर्व्हमध्ये सर्वाधिक तेजी नोंदविली गेली. इंड्सइंड बँक, HCL टेक्नॉलॉजी आणि बजाज फायनान्स यांची कामगिरी सरस राहिली. टेक महिंद्रा स्टॉक गुंतवणुकदारांची आज निराशा झाली. टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट आणि लार्सन अँड टुब्रो सर्वाधिक घसरणीचे शेअर्स ठरले. अर्थसंकल्पाच्या (Budget 2022) दिवशी काल (मंगळवारी) शेअर बाजार मोठ्या तेजीसह बंद झाला होता. सेन्सेक्स 848.40 अंकांच्या वाढीसह 58,862.57 वर आणि निफ्टी 237.00 अंकांच्या 17,576.85 वर बंद झाला होता. केंद्रीय अर्थसंकल्पाचे (Union Budget) सकारात्मक स्वागत शेअर बाजाराने केल्याच चित्रं दिसून येतं आहे.
• इंड्सइंड बँक (5.75)
• बजाज फिनसर्व्ह (5.04)
• एचसीएल टेक (3.37)
• बजाज फायनान्स (3.32)
• एचडीएफसी लाईफ (3.25)
• टेक महिंद्रा (-1.51)
• अल्ट्राटेक (-1.00)
• ब्रिटानिया (-0.97)
• नेस्ले (-0.92)
• हिरो मोटोकॉर्प (-0.89)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitaraman) यांनी आर्थिक पाहणी अहवालात चालू आर्थिक वर्षाचा विकास दर (GDP) हा 9.2 टक्के वर्तविला होता. कोरोना महामारीतून अर्थव्यवस्था सावरत असून, पुढील आर्थिक वर्षात विकासाला वेग येईल, असा विश्वास यावेळी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे गेल्या आठवड्यातील शेअर बाजारात असलेली मरगळ झटकली गेली.
केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवसापासून बाजारात तेजीचं चित्र पाहायला मिळालं. सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी कायम आहे. गुंतवणुकदारांच्या आशा उंचावल्या आहेत.
अर्थसंकल्पात आगामी निवडणुकांना लक्षात ठेवून भरघोस आणि आकर्षक अशा घोषणा करण्यात आल्या. महिलांसाठी तीन नव्या योजना सुरु करण्यात येणार आहेत. तसेच 2 लाख अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केला जाईल. आर्थिक वर्षे 2022-23 चा अंदाजित खर्च 39.45 लाख कोटी रुपये असेल.2023 पर्यंत 25 हजार किलोमीटरचा महामार्ग बांधला जाणार आहे. तसेच 3 वर्षात नव्या 400 बुलेट ट्रेन सुरु करण्यात येतील. देशात डिजिटल विद्यापीठाची स्थापना केली जाईल. येत्या 2 वर्षात देशात 80 लाख घरं तयार केली जाणार आहेत. शाळांमध्ये प्रत्येक वर्गात टीव्ही बसवला जाणार आहे.
Income Tax : इनकम टॅक्स जैसे थे आहे की खरंच बदललाय? सोप्या शब्दांत समजून घ्या!
Budget 2022: 80 लाख घरे बांधणार, लघु उद्योगांसाठी 2 लाख कोटी; वाचा बजेटमधील 25 मोठ्या घोषणा
BUDGET 2022: नोकरदारांना बजेटमध्ये नेमकं काय? करात किती सूट? ‘एनपीएस’मध्ये मोठा निर्णय