नवी दिल्ली: ज्यांनी अद्यापही यूएएनला आधार लिंक केले नाही, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या म्हणजेच 30 नोव्हेंबर हा आधार लिंकिंगचा शेवटचा दिवस आहे. 30 नोव्हेंबर नंतरही जर आधार आणि यूएएन लिंक नसेल तर संबंधित व्यक्तीच्या खात्यात पीएफ जमा होणार नाही. पीएफ सुविधेचा लाभ घेण्यासाठी ईपीएफओकडून यूएएन आणि आधार लिंकिंग सक्तीचे करण्यात आले आहे. आधार कार्ड यूएएनला लिंक केल्याने अनेक गैर प्रकाराला आळा घातला जाऊ शकतो, असे ईपीएफओच्या वतीने सांगण्यात आले आहे.
ईपीएफओकडून पीएफसाठी यूएएन नंबरला आधार कार्ड लिंक करण्याची सक्ती करण्यात आली आहे. जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पीएफ जमा करण्यात येणार नाही, असे ईपीएफओकडून सांगण्यात आले होते. दरम्यान यूएएन आधार लिंकिंगसाठी यापूर्वीच मुदत वाढ देण्यात आली आहे. त्याची मुदत वाढवून एक डिसेंबर 2021 करण्यात आली होती. आता मुदत वाढ मिळण्याची अपेक्षा नसल्याने, तुम्हाला येत्या दोन दिवसांमध्ये यूएएनला आधार लिंक करावे लागेल, अन्यथा तुमचा पीएफ खात्यात जमा होणार नाही.
जर आधार कार्ड यूएएनला लिंक नसेल तर तुमचे आणखी एक मोठे नुकसान होऊ शकते, एप्लॉईज डिपॉझिट लिंक्ड विम्यासाठी देखील ईपीएफओकडून आधार लिंक सक्तीचे करण्यात आले आहे. जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर विम्याचा हप्ता देखील रोखण्यात येईल, आणि तुम्हाला विम्यापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी यूएएनला आधार कार्ड लिंक करावे असे आवाहन ईपीएफओच्या वतीने करण्यात आले आहे. या कामासाठी ईपीएफओच्या वतीने अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
Sovereign Gold Bond Scheme :आजपासून प्रति 10 ग्रॅम 500 रुपये स्वस्त सोने खरेदीची संधी
एक डिसेंबरपूर्वी पटापट उरका ‘ही’ कामे; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
बँकांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ‘आरबीआय’चा महत्त्वपूर्ण निर्णय; …तर होणार कारवाई