मुंबई: कोणती महिला उद्योजक आहे जी मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांना टक्कर देते? अशी कोणती उद्योजिका आहे जी फक्त एका स्टार्टअप साठी आपल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून आली? या महिलेचा उद्योग हा सौंदर्य प्रसाधनांमध्ये अव्वल दर्जाचा उद्योग म्हणून ओळखला जातो. या महिलेची कंपनी आता 22,000 कोटी रुपयांची कंपनी बनली आहे. कोण आहे ही महिला? ही महिला आहे अद्वैता नायर! होय. फाल्गुनी नायर यांची लेक! अमेरिकेच्या एका मोठ्या कंपनीत सल्लागार ते एक यशस्वी उद्योजक, अद्वैताचा प्रवास प्रेरणादायी आहे.
फाल्गुनी नायर म्हणजेच अद्वैता नायर यांच्या आई या आधी इन्व्हेस्टमेंट बँकर होत्या. 2013 मध्ये त्यांनी ब्युटी प्रॉडक्ट्ससाठी ‘नायका’ या ऑनलाइन रिटेल स्टार्टअपची निर्मिती केली. फाल्गुनी नायर या नायका च्या संस्थापक आणि अद्वैता नायर ही नायकाची सह- संस्थापक त्याचबरोबर नायका फॅशनची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. नायका आता 22,000 कोटी रुपयांची कंपनी बनलीये.
अद्वैता नायर हिने मुंबईतील धीरूभाई अंबानी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. कमाल आहे ना? अंबानींच्या शाळेत शिकून आज ही मुलगी देतेय अंबानींनाच टक्कर! त्यानंतर अद्वैताने येल विद्यापीठातून अप्लाइड मॅथेमॅटिक्समध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (BA) केले. नंतर तिने हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि MBA पूर्ण केले.
2012 मध्ये अद्वैता नायर अमेरिकेतील बेन अँड कंपनीत सल्लागार म्हणून काम करत होती. तिची आई फाल्गुनी नायर यांनी कोटकमधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून या नायकाच्या बिझनेसला सुरुवात केली. आईला बिझनेसाठी झटताना बघून अद्वैताने सुद्धा आपली न्यूयॉर्कमधील मोठ्या पगाराची नोकरी सोडली आणि ‘नायका’च्या सहसंस्थापक पदी भारतात रुजू झाली.
अद्वैताने आपल्या आईसोबत सुरुवातीपासूनच या व्यवसायावर काम केलंय. फाल्गुनी यांचे अनेक इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि अद्वैताची डिजिटल मार्केटिंगची समज या व्यवसायात कामी आली. 2018 मध्ये, अद्वैताने नायका फॅशन लाँच केली आणि आपला व्यवसाय वाढविण्यासाठी व्यवसायाचे वेळोवेळी चाचणी केली.
नायका फॅशन लाँच झाल्यापासून मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओमार्ट, रतन टाटा समूहाची कंपनी टाटा क्लिक, मिंत्रा, ॲमेझॉन आणि इतर काही बलाढ्य कंपन्यांना बाजारपेठेत आपली व्याप्ती वाढवून कडवी टक्कर देण्यात ती यशस्वी ठरली आहे. अद्वैताची आई फाल्गुनी नायर ही भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, सुमारे 22,000 कोटी रुपये (2.7 अब्ज डॉलर) संपत्तीसह फाल्गुनी नायर फोर्ब्स 44 च्या भारतातील 2022 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 100 व्या स्थानावर आहेत.