UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) यांच्याकडून दिला जातो. जी तुमची ओळख असते. या नंबरवरुन तुम्ही पीएफमधील शिल्लक पासबुकच्या मदतीने तपासू शकतात. या शिवाय तुम्ही वेगवेगळे कंपन्याचे पीएफ बॅलेन्स नव्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करु शकतात. पण जर तुम्हाला तुमचा यूएएन नंबर माहित नसेल तर तुम्हाला कोणतीही माहिती मिळू शकणार आहे. तुम्ही तुमच्या EPFO खात्यात प्रवेश देखील करू शकणार नाही. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला UAN शोधण्याचा एक सोपा मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमचा UAN गरजेच्या वेळी कळू शकेल.
युनिव्हर्सल अकाउंट नंबरचा वापर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खाते ओळखण्यासाठी केला जातो. हा 12-अंकी क्रमांक असतो. कर्मचाऱ्यासाठी त्याच्या यूएएन नंबर कंपनी बदलली तरी सारखाच राहतो. तो कितीही वेळा नोकरी बदलली तरी तो बदलत नाही. कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे जमा आणि काढू शकतात. त्याच्या मदतीने, पीएफ खाते विलीन किंवा रद्द देखील केले जाऊ शकते.
जर तुम्ही ईपीएफओच्या अखत्यारीत येणाऱ्या कंपनीत काम करत असाल तर नोकरीत रुजू झाल्यानंतर ते तुमचे पीएफ खाते उघडेल आणि तुम्हाला यूएएन नंबर देईल. हे फक्त प्रथमच नोकरीत सामील झालेल्यांसाठी आहे. तुम्ही नोकरी बदलल्यास, नवीन कंपनीमध्ये तुमचे नवीन पीएफ खाते उघडले जाईल. UAN क्रमांक पूर्वीसारखाच राहील. तुम्ही UAN च्या मदतीने ते विलीन करू शकता.
UAN 12 अंकी असतो. जर तुम्ही तो कुठे सांभाळून ठेवला नसेल तर तुम्हाला UAN पुनर्प्राप्त करण्याची पद्धत देखील आम्ही सांगणार आहोत.