नवी दिल्लीः भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) ने देशभरात 166 स्वतंत्र आधार नोंदणी आणि अद्ययावत केंद्रे उघडलीत. शनिवारी एका अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली. सध्या 166 पैकी 55 आधार सेवा केंद्र (एएसके) कार्यरत आहेत. याशिवाय बँका, पोस्ट ऑफिस आणि राज्य सरकारांद्वारे 52,000 आधार नोंदणी केंद्रे चालवली जात आहेत.
UIDAI ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, UIDAI 122 शहरांमध्ये 166 एकल आधार नोंदणी आणि अद्ययावत केंद्रे उघडण्याची योजना आखत आहे. आधार सेवा केंद्रे आठवड्यातून सात दिवस उघडली जातात. आतापर्यंत या केंद्रांनी दिव्यांग व्यक्तींसह 70 लाख लोकांची गरज भागवली आहे. मॉडेल ए च्या आधार सेवा केंद्रांमध्ये (मॉडेल-ए एएसके) प्रतिदिन 1,000 नावनोंदणी आणि अपडेट विनंत्या हाताळण्याची क्षमता आहे. त्याच वेळी मॉडेल बी केंद्रे (मॉडेल-बी एएसके) 500 आणि मॉडेल-सी एएसके 250 ही नावनोंदणी आणि अद्ययावत विनंत्या पूर्ण करू शकतात. आतापर्यंत UIDAI ने 130.9 कोटी लोकांना आधार क्रमांक दिलेत.
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, खासगी सेवा केंद्रांवर आधार उपलब्ध नाही. आधार सेवा फक्त बँका, पोस्ट ऑफिसेस, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचे कार्यालय आणि UIDAI द्वारे संचालित आधार सेवा केंद्रात उपलब्ध आहेत. आधार केंद्रे खासगीत चालत नाहीत. यासंदर्भात अधिक माहिती राज्य सरकारच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळू शकते (ज्या अंतर्गत आधार केंद्रे चालू आहेत). ” तिथून प्रक्रिया स्पष्ट केली जाऊ शकते.
Sir I want to take a UIDAI franchise because no anyone UIDAI franchise in my 10km area so I requested you that you give me a UIDAI franchise please@ceo_uidai @UIDAI @UIDAILucknow
— Sadik (@sadakat90379880) June 6, 2021
दुसरीकडे तुम्ही इंटरनेट कॅफेमध्ये आधारचे पोस्टर्स, बॅनर इत्यादी पाहिले असतील. अशा परिस्थितीत ते कसे काम करतात, असा प्रश्न मनात निर्माण होतो. खरं तर कॅफे आधारशी संबंधित सेवा पुरवतात, जी यूआयडीएआय सामान्य माणसाला देते. आधार कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा इतर तपशिलात दुरुस्ती करणे, फोटो बदलणे, पीव्हीसी कार्ड छापणे, सामान्य आधार कार्ड ऑर्डर करणे इत्यादी कामे केली जातात.
सामान्य माणूस UIDAI च्या वेबसाईटवर या सर्व गोष्टी स्वतः करू शकतो. आता मोबाईल अॅप्सही आलेत. पण जे टेक्नो फ्रेंडली नाहीत, ते इंटरनेट कॅफेकडे वळतात. या सेवांसाठी UIDAI ने आकारलेली रक्कम, त्यात काही पैसे जोडून, कॅफे मालक सामान्य माणसाकडून घेतो.
उदाहरणार्थ, जन्मतारीख सुधारण्यासाठी किंवा पीव्हीसी कार्ड मिळवण्यासाठी यूआयडीएआयची निश्चित फी 50 रुपये आहे, तर कॅफे मालक सामान्य माणसाकडून सुमारे 70 ते 100 रुपये घेतो. अशा प्रकारे, तो अशा कामांसाठी 30 ते 50 किंवा अगदी 100 रुपये कमावतो.
संबंधित बातम्या
ज्येष्ठ नागरिकांना डिसेंबर 2021 पर्यंत हवाई तिकिटांवर 50% सूट, जाणून घ्या
Yes Bank चा ‘फेस्टिव्ह’ धमाका, गृह कर्जावरील व्याजदरात 2.25% च्या कपातीची घोषणा