Ultra Rich | भारत पुन्हा होणार सोने की चडिया? वर्षभरात असा वाढला श्रीमंतांचा आकडा

| Updated on: Mar 02, 2024 | 2:15 PM

Ultra Rich | आता देशात काय परिस्थितीत आहे, यावर भाष्य करण्याची आवश्यकता आहे का? एकीकडे गरिबांना राशन वाटपाचा कार्यक्रम वाढविण्यात आला आहे, तर अनेक जण दारिद्रय रेषेबाहेर आल्याचा केंद्राचा दावा आहे. महागाई वाढली आहे. अशा परिस्थितीत एका वर्षात 750 भारतीयांच्या डोई श्रीमंतीचा मुकूट चढला आहे.

Ultra Rich | भारत पुन्हा होणार सोने की चडिया? वर्षभरात असा वाढला श्रीमंतांचा आकडा
Follow us on

नवी दिल्ली | 2 March 2024 : भारतात नवश्रीमंत वर्ग झपाट्याने वाढत चालला आहे, असा दावा नाईट फ्रँक या संस्थेने केला आहे. सध्या भारत संक्रमण अवस्थेतून जात आहे. केंद्र सरकारच्या दाव्यानुसार, देशात गरिबांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. तर महागाईमुळे मध्यमवर्ग मेटाकुटीला आला तर गरिबांची अवस्था किती दयनीय असेल याचा विचारच नको, असा दावा विरोधकांनी केला आहे. पण नाईट फ्रँकनुसार, देशात एकाच वर्षात 750 भारतीय श्रीमंत झाले आहेत. तर सर्वाधिक श्रीमंतांचा आकडा पण वाढला आहे. काय आहे हा दावा?

देशात श्रीमंतीचा ओघ

तर दाव्यानुसार, देशात अल्ट्रा हाय नेट वर्थ म्हणजे सर्वाधिक कमाई करणाऱ्यांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. ज्यांची कमाई जवळपास अडीचशे कोटी रुपये आहे, त्यांना गर्भश्रीमंत म्हणतात. तर या नाईट फ्रँकच्या म्हणण्यानुसार, देशात अशा लोकांची संख्या 2023 मध्ये 6.1 टक्क्यांनी वाढली. 2022 मध्ये हा आकडा 12 हजार 495 इतका होता. गेल्या वर्षी हा आकडा वाढून 13 हजार 263 झाला. तर 2028 पर्यंत त्यात 50 टक्क्यांची वाढ होऊन ही संख्या 19 हजार 908 होईल.

हे सुद्धा वाचा

यंदा 90 टक्के श्रीमंतांची संपत्तीत वाढ

आपण 2022 आणि 2023 ची गर्भश्रीमंतांची संख्या वाचली. तर चार वर्षानंतर हा आकडा किती होईल, याचा अंदाज बघितला. या वर्षात काय जादू होणार, ते पाहुयात. नाईट फ्रँकच्या वृत्तानुसार, यंदा, 2024 मध्ये, 90 टक्के गर्भश्रीमंतांना त्यांच्या संपत्तीत वाढीची अपेक्षा आहे. त्यांना संपत्तीत 10 टक्के वाढ होण्याचा विश्वास आहे. 63 टक्के धनकुबेरांना संपत्तीत वाढ होण्याचा विश्वास आहे. भारतीय अर्थव्यवस्था सध्या सर्वाधिक वेगाने आगेकूच करत आहे.

श्रीमंतांचे तरीही पलायन

  1. जगभरात श्रीमंतांचा आकडा वाढत आहे
  2. तर झपाट्याने श्रीमंतांचा वर्ग तयार होण्यात तुर्की सर्वात पुढे आहे
  3. अमेरिकेतही श्रीमंत वर्ग फोफावत आहे
  4. यादीत भारतीयांचा क्रमांक तिसरा, तर त्यानंतर दक्षिण कोरियाचा क्रमांक आहे
  5. पण त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हमजे हे नवश्रीमंत त्यांच्या देशात राहायला तयार नाहीत
  6. ते केल्याने देशाटन म्हणत, दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारत आहेत
  7. युरोप, ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिकेत स्थायिक होणाऱ्या श्रीमंतांचा आकडा सर्वाधिक आहे