या डिजिटल बँकिंगच्या वेगवान जगात, तुम्ही व्हिडीओ केवायसीद्वारे सहजतेने बचत खाते उघडू शकता । बचत खाते उघडण्यासाठी बँकेच्या शाखेला जाऊन सर्व कागदपत्रे सोबत नेण्याचे आणि वेळ घालवण्याचे दिवस आता गेलेत. याच पार्श्वभूमीवर, महाबँक V-CIP (व्हिडीओ -आधारित ग्राहक ओळख प्रक्रिया) किंवा व्हिडीओ केवायसी मुळे ऑनलाइन बचत खाते उघडणे अधिक सोपे आणि सुरक्षित झाले आहे. विडिओ केवायसी ही एक आधुनिक प्रणाली आहे ज्याद्वारे ग्राहक त्यांचे बचत खाते घरी बसल्या ऑनलाइन प्रक्रियेसह खाते उघडू शकतात. या प्रक्रियेत बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत सुरक्षित व्हिडीओ कॉलद्वारे ओळख पटविण्याची परवानगी मिळते, तसेच गोपनीयता व सुरक्षा देखील सुनिश्चित केली जाते.
V-CIP प्रक्रियेमध्ये खाते डिजिटल स्वरूपात उघडले जाते, ज्यासाठी आधार ओटीपी पडताळणी (UIDAI कडून) आणि पॅन नंबरची पडताळणी (NSDL कडून) केली जाते. या प्रक्रियेमध्ये बँकेचे अधिकारी तुमचे केव्हायसी कागदपत्रे व स्वाक्षऱ्या थेट विडिओ कॉलद्वारे तपासतात. याशिवाय, या प्रक्रियेमध्ये AI-आधारित चेहर्याची पडताळणी तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाते, ज्यामुळे तुमची ओळख पटकन आणि अचूकपणे निश्चित होते. महाबँकेत ऑनलाईन बचत खाते उघडण्यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या गोष्टींचे पालन करावे लागेल आणि तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
आधार क्रमांक
पॅन कार्ड
आधार कार्डाशी जोडलेला मोबाईल नंबर
चांगल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह कॅमेर्याची सुविधा असलेले उपकरण
1. वैयक्तिक माहिती व कागदपत्रे अपलोड करा
ही सुविधा नवीन ग्राहकांसाठी आहे. येथे क्लिक करून तुमची मूलभूत माहिती आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा. तुमच्या ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे स्पष्ट स्कॅन किंवा फोटो स्वरूपात अपलोड करा.
2. विडिओ कॉलसाठी वेळ निश्चित करा
बँक प्रतिनिधीसोबत 10 मिनिटांचा विडिओ कॉल ठरवावा लागेल. पडताळणी प्रक्रियेत व्यक्तिशः संवादाची सुविधा मिळते. तपासणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मूळ कागदपत्रे तयार ठेवा.
3. परस्पर पडताळणी
सुरळीत विडिओ कॉलसाठी चांगल इंटरनेट असणे गरजेचे आहे. सबमिट केलेल्या कागदपत्रे व वैयक्तिक माहितीशी संबंधित काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे दाखवणे आवश्यक आहे.
ATM कार्ड ग्राहकाच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाते.
खाते उघडल्यानंतर ग्राहकाने खात्यात किमान शिल्लक नसेल तर दंड होऊ नये म्हणून रक्कम जमा करावी.
इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड आणि यूजर आयडी नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवले जातात.
एटीएम डेबिट कार्ड सक्रिय करणे, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, व्हॉट्सॲप बँकिंग व चेकबुकची मागणी डिजिटल पद्धतीने केली जाऊ शकते.
महाबँकेच्या विडिओ केवायसीद्वारे ऑनलाइन बचत खाते उघडण्याची प्रक्रिया बँकिंगच्या डिजिटल परिवर्तनात एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही प्रक्रिया ग्राहकांना सहज, सुरक्षित व सोप्या पद्धतीने खाते उघडण्याची संधी देते, ज्यामुळे शाखेत प्रत्यक्ष भेट देण्याची गरज संपते. महाबँकची ही सुविधा बँकिंग अधिक सोपी व ग्राहकाभिमुख करते, ज्यामुळे आर्थिक सेवा अधिक लोकांपर्यंत पोहोचतात.