आता अनेक बँकांमध्ये रोख रक्कम जमा करण्यासाठी काऊंटरसह एका मशीनचा वापर वाढला आहे. शाखेत अथवा एटीएम केंद्रात या मशीन उपलब्ध असतात. रोख जमा करण्यासाठी सध्या डेबिट कार्डचा वापर करावा लागतो. पण लवकरच UPI च्या माध्यमातून बँकेत तुम्ही रोख रक्कम जमा करु शकता. युपीआयच्या माध्यमातून कॅश डिपॉझिट मशीनमध्ये रोख जमा करण्याची सुविधा RBI लवकरच उपलब्ध करुन देईल. पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची घोषणा केली. सध्या एटीएमच्या माध्यमातून युपीआयमधून रोख रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. कार्डलेसच्या माध्यमातून ही रक्कम काढता येते.
केव्हा सुरु होणार ही सुविधा
कॅश डिपॉझिट मशीनमधअये पैसे जमा करण्याची सुविधा लवकरच सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही सुविधा आरबीआय केव्हा सुरु करणार याची माहिती दिलेली नाही. त्यांनी सध्या घोषणा केली. याविषयीची सुविधा कधी सुरु होणार, याची निश्चित तारीख गव्हर्नर यांनी दिली नाही.
कर्मचाऱ्यांवरील ताण होणार कमी
डिजिटल पेमेंट सिस्टिमला मिळेल प्रोत्साहन
सध्या पीपीआय ते युपीआय दरम्यान व्यवहारासाठी पीपीआय कार्डचा वापर होतो. पण या त्यासाठी मोबाईल ॲप अथवा संबंधित संकेतस्थळाचा उपयोग करावा लागतो. आता पीपीआय -युपीआयच्या व्यवहार सुलभीकरणासाठी मंजुरीचा प्रस्ताव समोर आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास छोट्या रक्कमेचा वापर वाढेल. त्यामुळे व्यवहारासाठी डिजिटल माध्यमांच्या वाढीला मंजुरी मिळेल.
सरकारी योजनेत गुंतवणुकीसाठी ॲप
आरबीआय गव्हर्नर यांनी अजून एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आरबीआय सरकारी योजनांमध्ये लोकांना थेट गुंतवणूक करता यावी यासाठी एक ॲप लाँच करणार आहे. त्यामध्यमातून सरकारी योजनांमध्ये थेट गुंतवणूक करता येईल. सध्या आरबीआयच्या पोर्टलवर सरकारी सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक खाते उघडू शकता.
रेपो रेट मध्ये नाही बदल
नवीन आर्थिक वर्षात ही रेपो दरात काहीच बदल न करुन आरबीआयने सप्तपदी पूर्ण केली. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सहाव्यांदा केंद्रीय बँकेने रेपो दर 6.50 कायम ठेवला होता. पेट्रोल-डिझेल, एलपीजीच्या किंमती कमी झाल्या आहेत. पण अन्नधान्याच्या किंमती अजूनही चढ्याच आहेत. गेल्या दोन वर्षांत डाळी, तांदळाने, साखरेने, गव्हाने तर इतर चीज वस्तूंनी सरकारचे नाकेनऊ आणले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात टोमॅटो, कांदा, लसूण, आलू, अद्रक आणि इतर भाजीपाल्याच्या किंमतींनी ग्राहकांची दमछाक केली आहे. या सर्व कारणांमुळे रेपो दरात कुठलाच बदल केला नसल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे.