Dollar vs Rupees मुंबई : रुपयाच्या मुल्यात सातत्याने पडझड होत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयांचं मुल्य मागील दोन महिन्यांच्या निचांकी स्तरावर आहे. कच्चा तेलाची किंमत सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे शेअर बाजारात पडझड होतेय. याच दरम्यान डॉलरच्या तुलनेत सलग तिसऱ्या दिवशी रुपयाचं अवमुल्यन झालंय. रुपयाच्या मुल्यात 23 पैशांची घट होऊन प्रति डॉलर 74.55 झाला (Value of Rupees sliping by 23 paisa against dollar reached at low of 2 months).
बाजारात रुपयाची सुरुवात पडझडीसह 74.37 वर झाली. मागील सत्रात ही किंमत 74.32 रुपये प्रति डॉलर होती. दिवसभरात रुपयाच्या किमतीत 74.34 ते 74.63 रुपये प्रति डॉलर या दरम्यान चढउतार होत राहिले. अखेर रुपया मागील व्यापारी सत्राच्या तुलनेत रुपयाची 23 पैशांनी घट होऊन 74.55 प्रति डॉलरवर बाजार बंद झाला. 27 एप्रिलनंतरची ही सर्वात कमी किंमत आहे. मागील 3 दिवसात रुपयात जवळपास 36 पैशांची घट झालीय.
डॉलर सलग सातव्या दिवशी वधारलाय. सध्या डॉलर +0.022 च्या वाढीसह 92.453 च्या स्तरावर पोहचलाय. ही इंडेक्स जगातील 6 प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरला मजबूत दाखवत आहे. गुरुवारी (1 जुलै) सलग चौथ्या दिवशी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालीय. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात 1.11 डॉलरच्या वाढीसह कच्च्या तेलाची किंमत 75.73 डॉलर प्रति बॅरलवर पोहचलीय.
दुसरीकडे सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली. आज 30 शेअर्सच्या इंडेक्स सेंसेक्समध्ये 164 अंकांची घट झाली आणि 52318 वर बाजार बंद झाला. 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी 41 अंकांनी कमी होऊन 15680 च्या स्तरावर बंद झाला. सेंसेक्सच्या 30 पैकी 17 शेअरमध्ये पडझड झाली आणि 13 शेअरमध्ये वाढ होऊन बाजार बंद झाला.
रुपयाच्या किमतीत पडझड आणि डॉलरमधील वाढ होत असतानाच सोने व चांदीच्या किमतीत चांगली वाढ होताना दिसत आहे. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर 526 रुपयांनी (Gold price today) वाढले, तर चांदीची किंमत 1231 रुपयांनी वाढली. या वाढीसह सोन्याचे दर 46,310 रुपये प्रति तोळा आणि चांदी 68,654 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचले.
Value of Rupees sliping by 23 paisa against dollar reached at low of 2 months