नवी दिल्लीः दुचाकी हे आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय वाहन आहे. वैयक्तिक वाहतुकीसाठी हे सर्वात योग्य माध्यम समजले जाते. हे स्वस्त असून, कमी देखभाल खर्चसुद्धा असतो. याशिवाय रहदारीतून बाहेर पडतानाही दिलासा मिळतो. एका अहवालानुसार, मेट्रो शहरांमध्ये कारने पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या तुलनेत बाईक एक तृतीयांश वेळेत आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवू शकते.
बाईक बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास आपल्या देशात दोन प्रकारचे युजर्स आहेत. पॉइंट ए ते पॉइंट बी दरम्यान दररोज प्रवास करणारे वापरकर्ते आहेत. ते कार्यालयात जाण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी बाईक वापरतात. अशा वापरकर्त्यांना स्वतःसाठी 100-150cc च्या बाईक्स खरेदी करायला आवडतात. इतर वापरकर्ते आहेत, जे शो आणि छंदासाठी बाईक वापरतात. या बाईक 1500 सीसीपेक्षा जास्त असतात.
कोरोनामुळे लोक मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतुकीऐवजी वैयक्तिक वाहतुकीचा वापर करू लागलेत. जर तुम्हाला बाईक घ्यायची असेल तर त्यासाठी फायनान्सिंग सुविधाही उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत कर्ज घेऊन बाईक घ्यायची का, असा मोठा प्रश्न निर्माण झालाय.
जर तुम्ही कर्जावर बाईक खरेदी केली तर त्यातील काही भाग डाऊन पेमेंट म्हणून जमा करावा लागतो. कर्जाच्या मदतीने बाईक खरेदी केल्याने तुम्ही तुमच्या आवडीची बाईक खरेदी करू शकता.
तुम्ही कर्जावर बाईक विकत घेतल्यास तुमची बचत अबाधित राहते. तुमच्या बचतीचा अशा प्रकारे वापर करू नका, असा सल्ला आर्थिक तज्ज्ञांनी दिलाय. तुमच्या बचतीत काही तरी ठेवणे नेहमीच महत्त्वाचे असते. कर्जामुळे तुमची बचत कायम राहते आणि तुम्ही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार असता.
बाईक खरेदी करण्यासाठी बँका आणि NBFC खूप स्वस्त कर्ज देतात. बाईक कर्ज 7-8 टक्के दराने उपलब्ध आहे. तज्ज्ञांनी बाइकसाठी जास्तीत जास्त 2 वर्षांच्या कर्जाचा कालावधी निवडण्याचा सल्ला दिला आहे.
संबंधित बातम्या
‘या’ 5 क्रेडिट कार्डांवर सर्वोत्तम कॅशबॅक, तुम्हीसुद्धा फायदा घेऊ शकता
29 नोव्हेंबरपासून स्वस्त सोने खरेदीची संधी, किती पैसे मोजावे लागणार?